अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरुवात, EMI संदर्भात RBIची मोठी घोषणा

अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरुवात, EMI संदर्भात RBIची मोठी घोषणा

लॉकडाऊन आणि कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेनं EMI वरील व्याज दरात दोन वेळा 1.5 टक्क्यांनी कपात केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्यानंतर पुन्हा एकदा हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचं RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली. एप्रिलच्या तुलनेत आता अर्थव्यवस्था बऱ्याच तुलनेत सुधारायला सुरुवात झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय EMI, रेपो दरातील बदल आणि अनेक निर्णयांबाबत घोषणा केली आहे.

लॉकडाऊन आणि कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेनं EMI वरील व्याज दरात दोन वेळा 1.5 टक्क्यांनी कपात केली आहे. याशिवाय रेपो दर टक्के तर रिव्हर्स रेपो दर 3.3 टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या बैठकीत रेपो दराबाबत कोणताही बदल झालेला नाही. रेपो दरात बदल म्हणजे तुम्हाला ईएमआय किंवा कर्जाच्या व्याज दराबाबत कोणताही दिलासा मिळणार नाही. रेपोदर 4 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के असल्याची माहिती RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.

हे वाचा-याठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाला 90 दिवसात 700% नफा, तुमचाही होऊ शकतो फायदा

आरबीआयच्या धोरणाचा आढावा घेतल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, देशात आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली आहे. त्यांनी सांगितले की चांगली गोष्ट म्हणजे भारतीय परकीय चलन साठा वेगाने वाढत आहे. जानेवारी ते जून या काळात मोठ्या अर्थव्यवस्थांची आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती. चांगल्या उत्पन्नामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. कर्जाच्या दरात मोठी घसरण झाली.

 

Published by: Kranti Kanetkar
First published: August 6, 2020, 12:54 PM IST

ताज्या बातम्या