मराठी बातम्या /बातम्या /मनी /

याठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाला 90 दिवसात 700% नफा, तुमचाही होऊ शकतो फायदा

याठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाला 90 दिवसात 700% नफा, तुमचाही होऊ शकतो फायदा

गेल्या तीन महिन्यात सोन्याव्यतिरिक्त सर्वात जास्त रिटर्न शेअर बाजारातून मिळाला आहे. सर्वाधिक नफा अमेरिकन शेअर बाजारातून मिळाला आहे. तुम्ही देखील याचा फायदा घेत कमाई करू शकता

गेल्या तीन महिन्यात सोन्याव्यतिरिक्त सर्वात जास्त रिटर्न शेअर बाजारातून मिळाला आहे. सर्वाधिक नफा अमेरिकन शेअर बाजारातून मिळाला आहे. तुम्ही देखील याचा फायदा घेत कमाई करू शकता

गेल्या तीन महिन्यात सोन्याव्यतिरिक्त सर्वात जास्त रिटर्न शेअर बाजारातून मिळाला आहे. सर्वाधिक नफा अमेरिकन शेअर बाजारातून मिळाला आहे. तुम्ही देखील याचा फायदा घेत कमाई करू शकता

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus Pandemic) बचत करणे कठीण झाले आहे, त्यात अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर घटवल्यामुळे सामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मते या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. शेअर बाजारात काहीशी जोखीम पत्करून गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळण्याची संधी आहे. यावर्षी मार्चमध्ये शेअर बाजारात झालेल्या घसरणीनंतर अनेक गुंतवणूकदार याठिकाणी दाखल झाले आहेत. गेल्या 4 महिन्यात बाजारात झालेल्या रिकव्हरीमुळे गुंतवणूकदारांना फायदा मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. अमेरिकन शेअर बाजारात ही नफा कमावण्याची संधी अधिक आहे. या दरम्यान अमेरिकन टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांची कमाई कित्येक पटींनी वाढवली आहे. केवळ 3 महिन्यात मिळाला 700 टक्के नफा इकॉनॉमिक्स टाइम्समधील वृ्त्तानुसार भारतीय शेअर बाजारात ज्याठिकाणी रिलायन्स समूहाने 23 मार्चनंतर 145 टक्के रिटर्न दिला आहे, त्याचवेळी एलन मस्कची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये या काळात 750 टक्क्यांची तेजी पाहायला मिळत आहे. या शेअरमध्ये झालेल्या वाढीनंतर गुंतवणूकदार आश्चर्यचकित आहेत. (हे वाचा-Amazonवर यादिवशी मिळणार बंपर सूट, 70% डिस्काउंटने खरेदी करा विविध प्रोडक्ट्स) फेसबुक, अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल आणि गूगल सारख्या अमेरिकी कंपन्यांनी मार्चमधील सर्वात खालच्या स्तरापासून गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला आहे. गूगल आणि अ‍ॅपलमधून मिळालेला रिटर्न अनुक्रमे 57 टक्के आणि 63 टक्के आहे. यावर्षीच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये या कंपन्यांनी आतापर्यंत 66.7 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. टेस्लामध्ये आतापर्यंत 232 टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एसकॉर्ट सिक्योरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी न्यूज 18 हिंदीशी केलेल्या बातचीतमध्ये असे म्हटले की, परदेशामध्ये गुंतवणूक भारतीयांसाठी एक नवा पर्याय आहे. ते म्हणाले की, परदेशात गुंतवणूक श्रीमंत वर्गाला आकर्षित करतो मात्र अर्धवट माहितीच्या आधारे आंततराष्ट्रीय बाजारात गुंतवणूक केली नाही पाहिजे. परदेशी बाजारात पैसे लावायचे असल्यास काय करावे लागेल? सर्वात आधी केवायसी करावे लागेल. आसिफ इकबाल यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अमेरिकन नियामक सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन (एसईसी)मध्ये रजिस्टर्ड असणाऱ्या कोणत्याही ब्रोकरकडे  ट्रेडिंग अकाउंट उघडावे लागेल. जसे भारतात डिमॅट अकाउंट काढावे लागते. याकरता ग्राहकांना केवायसी करणे आवश्यक आहे. (हे वाचा-फसवणूकीबाबत RBI ने दिला इशारा! सतर्क न राहिल्यास बँक खाते होईल रिकामे) अमेरिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डॉलरची आवश्यकता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या लिबरलाइज्ड रेमीटेन्स स्कीमच्या माध्यमातून भारतीय गुंतवणूकदार अमेरिकेत 2.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकतात. अमेरिकन ट्रेडिंग अकाउंटमध्ये ही रक्कम जमा झाल्यानंतर गुंतवणूकदार अमेरिकन शेअरबाजारात गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूकदार जर भारतीय बँकेत पैसे परत आणण्यास इच्छितो तर ऑनलाइन हे काम होऊ शकते. लक्षात ठेवा या गोष्टी ज्या ब्रोकरकडे तुम्ही ट्रेडिंग अकाउंट उघडले आहे, तो सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन (एसईसी)मध्ये रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. भारतातील रेग्यूलेटरी बॉडी सेबी (SEBI) आहे, तर अमेरिकेत SEC आहे. अमेरिकेमधील सिक्युरिटीज इन्व्हेस्टर प्रोटेक्शन कॉरपोरेशन (एसआईबीसी) ही संस्था प्रत्येक ट्रेडिंग अकाउंटला 5 लाख डॉलरपर्यंत इन्शूअर करते. गुंतवणूकदाराला हे तपासणे आवश्यक आहे की, ज्या ब्रोकरकडे तुम्ही अकाउंट उघडले आहे, तो SIBC चा सदस्य आहे की नाही. एसआयबीसीच्या वेबासाइटवर तुम्ही ही बाब तपासू शकता.
First published:

पुढील बातम्या