मुंबई, 20 जानेवारी: जुनी पेंशन योजना (OPS) बाबत देशभरात विविध चर्चा सुरू आहेत. या सगळ्यामध्ये अनेक राज्यांमध्ये जुनी पेंशन व्यवस्था लागू केली जात आहे. त्याच वेळी, अनेक राज्यांमध्ये, त्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला आहे. नवीन आणि जुनी पेंशन योजनेबद्दल, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की सरकारी खर्च कमी होईल, परंतु भविष्यासाठी दायित्वे वाढतील. जुनी पेंशन योजना ही देशासाठी धोकादायक असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
रघुराम राजन यांनी बँकांना रिटेल कर्जावर जास्त झुकते माप देऊ नये, असा इशाराही दिला आहे. एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाले की, नवीन पेंशन योजना स्वीकारणे योग्य आहे कारण जुन्या पेंशन योजनेमध्ये दायित्वे वाढली होती आणि सध्या जी राज्ये जुनी पेंशन स्वीकारत आहेत. त्यांना येणाऱ्या काळात अडचणींचा सामना करावा लागेल.
'21 वर्षे काम केलं अन्....', नोकरी गेल्यानंतर Microsoft च्या कर्मचाऱ्याचे भावुक पत्र
दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या रघुरामन राजन यांनी एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सध्या लागू केलेली राष्ट्रीय पेंशन योजना प्रत्येक बाबतीत योग्य आहे. जुन्या पेंशन योजनेत अनेक त्रुटी आहेत. राजन म्हणाले की, सरकारांना अशा योजनांचा अवलंब करणे सोपे आहे, ज्याचा लाभ झटपट मिळतो. पण आता दायित्वाकडे पाहिले जात नाही. जे भविष्यासाठी चांगले नाही.
Tata ची ग्राहकांना भेट! 'या' कारच्या किंमती केल्या कमी
राजन पुढे मुलाखतीत म्हणाले की, हे प्रत्येक राज्य सरकारने ठरवायचे असले तरी, या योजना समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभावीपणे लक्ष्य केल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना लाभ मिळू शकतील.
देशातील सरकारी कर्मचार्यांसाठी सध्या लागू करण्यात आलेल्या नॅशनल पेंशन सिस्टिमच्या जागी जुनी पेंशन योजना परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेस जुन्या पेंशन योजनेची बाजू घेत आहे. काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशने जुनी पेंशन योजना पुन्हा लागू केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Business News, Pension, Pension scheme, Raghuram rajan