मुंबई, 20 जानेवारी: मायक्रोसॉफ्टने 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एकूण कर्मचाऱ्यांना पाच टक्के लोकांना कामावरुन काढलेय. नुकतेच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेले पत्र व्हायरल झाले होते. या पत्रात ते म्हटले आहे की, दीर्घकालीन उद्दिष्टे लक्षात घेऊन ही नोकर कपात करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टने बुधवारी नोकर कपातीची घोषणा केल्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याच टाळेबंदीची चर्चा सुरु होती. मायक्रोसॉफ्टने कामावरुन काढून टाकलेला प्रत्येक कर्मचारी आपली कथा सोशल मीडियावर सांगत होते. अनेक वर्षे याच कंपनीत काम केलेल्या लोकांनाही मायक्रोसॉफ्ट कंपनीने काढून टाकले. अशाच एका भारतीय व्यक्तीचे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मायक्रोसॉफ्टमध्ये 21 वर्षांपासून कार्यरत असलेल्या भारतीय प्रशांत कमानी यांचे नावही मायक्रोसॉफ्टच्या छाटणीच्या यादीत आहे. कमानी यांनी कामावरून काढून टाकल्यानंतर लिंक्डइनवर लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये कमानी यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये घालवलेल्या वेळेचे भावनिक वर्णन केले आहे.
Microsoft च्या CEO ने वाढवलं टेन्शन! पत्र लिहून दिली महत्त्वाची माहिती =
सिएटलमध्ये राहणारे प्रशांत कमानी यांनी 1999 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर डिझाईन इंजीनियर म्हणून करिअरला सुरुवात केली होती. कॉलेजनंतरची ही त्यांची पहिली नोकरी होती. मायक्रोसॉफ्टमध्ये सलग 15 वर्षे काम करून ते सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग मॅनेजर या पदापर्यंत पोहोचले. 2015 मध्ये, त्यांनी मायक्रोसॉफ्ट सोडले आणि अॅमेझॉनमध्ये गेले. त्यानंतर 2017 मध्ये, ते प्रिन्सिपल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून मायक्रोसॉफ्टमध्ये परत आले. तेव्हापासून ते फक्त मायक्रोसॉफ्टमध्ये होते.
तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता? बिल गेट्स यांनी सांगितलं Success चं सिक्रेट
प्रशांत यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिले की, 'कॉलेजनंतर माझी पहिली नोकरी मायक्रोसॉफ्टमध्ये होती. मी पहिल्यांदा परदेशात आलो तेव्हा मी थोडा घाबरलो आणि उत्साही होतो. जीवनात माझ्यासाठी काय लिहिलेय याविषयी मी विचार करत होतो. मायक्रोसॉफ्टमध्ये 21 वर्षांहून अधिक काळ काम केल्यामुळे, अनेक भूमिका बजावल्या, अनेक ऑर्गेनाइजेशनमध्ये काम केले… मी म्हणू शकतो की हा सर्व प्रवास खूप समाधानकारक आणि फायद्याचा राहिलाय.'
कमानी यांनी लिहिले आहे की, त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत मिळवलेला अनुभव केवळ वर्षांमध्ये मोजता येणार नाही. कारण तो अथांग आहे. ते म्हणाले की, 'मी मायक्रोसॉफ्टचा आभारी आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये मला अतिशय प्रतिभावान आणि हुशार लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. त्याचाही मी ऋणी आहे.'
प्रशांत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ते त्यांच्या कुटुंबाचे ऋणी आहेत. त्यांनी लिहिले, 'मी कुटुंबाला आधार देण्यासाठी नेहमीच उपस्थित नव्हतो, परंतु मला मदत करण्यासाठी ते नेहमीच तयार होते. मला माहित आहे की माझी नोकरी गेल्याचे मला जेवढे दुःख होतेय. तेवढेच त्यांनाही होतेय. माझ्या सर्व चढ-उतारात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल मी माझ्या कुटुंबाचा आभारी आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Business News, Microsoft