मुंबई, 05 ऑक्टोबर: एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक (Investment Planning) करताना प्रत्येकाचा विचार असा असतो की यातून आपल्याला चांगला रिटर्न (How to get Good Return) कसा मिळेल? आणि आपले पैसे सुरक्षित राहतील ना? सरकारी योजनांमध्ये (Get Good return from government scheme) तुम्हाला चांगला रिटर्न आणि सुरक्षा दोन्ही मिळेल. अलीकडच्या काळात बँकांनी व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे तुम्हाला एफडी, बचत खात्यातून कमी रिटर्न मिळेल. दरम्यान आणखी एका गुंतवणुकीच्या पर्यायाचा तुम्ही विचार करू शकता तो म्हणजे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम. पोस्टाच्या विविध योजनांमध्ये (Post office investment schemes) गुंतवणूक करणाऱ्यावर अनेकजण भर देतात. यामध्ये चांगला रिटर्न आणि सुरक्षा दोन्ही फायदे मिळतात. जाणून घ्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटविषयी..
हे वाचा-दिवाळी बोनससह मिळणार 18 महिन्यांचा थकित DA, मोदी सरकार लवकरच करणार घोषणा
फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit FD) मध्ये गुंतवणूक करण्यात अनेकजण प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिटच्या (Post Office Time Deposit Scheme) नावाने ही स्कीम उपलब्ध आहे. बँकेच्या तुलनेत या योजनेत चांगला रिटर्न मिळेल. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वार्षिक व्याजदर 2.70 टक्के आहे. SBI मध्ये 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 5.4 टक्के दराने व्याज मिळेल. या तुलनेत पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिटमध्ये (Time Deposit of PO) 6.7 टक्के दरापर्यंत व्याज मिळेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.4 टक्के आहे.
किती करावी लागेल गुंतवणूक?
तुम्हाला या योजनेत कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जास्तीत जास्त शंभरच्या पटीमध्ये येणारी कोणतीही रक्कम यात गुंतवता येईल. यामध्ये तुम्ही 1 वर्ष, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करू शकता.
हे वाचा-Bharati Airtel Rights Issue: भागधारकांना 535 रुपयांत मिळतील शेअर्स
किती मिळेल व्याज?
पोस्ट ऑफिसच्या एक, दोन आणि तीन वर्षांच्या या एफडी योजनेमध्ये (Time deposit) तुम्हाला 5.5 टक्के व्याज मिळेल तर 5 वर्षांच्या एफडीवर 6.7 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. या योजनेतील व्याज तिमाही आधारावर कॅलक्यूलेट केले जाते. दरम्यान व्याजाचे पेमेंट वार्षिक आधारावर केले जाते. यामध्ये कोणतीही व्यक्ती सिंगल अकाउंट काढू शकेल किंवा 3 प्रौढ व्यक्ती मिळून जॉइंट अकाउंट देखील काढू शकतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fixed Deposit, Post office, Post office bank, Post office customers, Post office facility, Post office money, Post office saving, Sbi fixed deposit