मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Bharati Airtel Rights Issue: डिस्काउंटमध्ये खरेदी करा शेअर्स! भागधारकांना 535 रुपयांत मिळेल शेअर

Bharati Airtel Rights Issue: डिस्काउंटमध्ये खरेदी करा शेअर्स! भागधारकांना 535 रुपयांत मिळेल शेअर

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल त्यांच्या शेअरहोल्डर्सना स्वस्तात (Buy Bharati Airtel Share at low cost) शेअर खरेदीची संधी देत आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 05 ऑक्टोबर: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल त्यांच्या शेअरहोल्डर्सना स्वस्तात (Buy Bharati Airtel Share at low cost) शेअर खरेदीची संधी देत आहे. दूरसंचार कंपनी भारती एअरटेलच्या भागधारकांना कंपनीचे शेअर्स सवलतीत खरेदी करण्याची संधी आहे. एअरटेलचा राइट्स इश्यू (Bharati Airtel Rights Issue) आजपासून सुरू झाला आहे आणि 21 ऑक्टोबर रोजी बंद होईल. राइट्स इश्यूद्वारे 21,000 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. 230 रुपयांच्या प्रीमियमसह प्रति शेअर 535 रुपये निधी उभारला जाईल. सध्या भारती एअरटेलचा शेअर 695 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर राइट्स इश्यू मध्ये कंपनी त्यांच्या शेअरहोल्डर्सना शेअर 535 रुपयांत विकणार आहे. त्यामुळे तुम्ही जर शेअरहोल्डर असाल तर चांगलं डिस्काउंट मिळवण्याची संधी आहे.

या राइट्स इश्यूद्वारे 21,000 कोटी रुपयांचा उभा करण्याची योजना कंपनीने आखली आहे. दरम्यान भारती एअरटेलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी 29 ऑगस्ट रोजी या राइट्स इश्यूच्या माध्यमातून  21,000 कोटी रुपयांचा उभा करण्यासाठी परवानगी दिली होती.

वाचा-सोन्याच्या दरात मोठी घसरण, रेकॉर्ड हायपेक्षा 9400 रुपयांनी स्वस्त आहे सोनं

कशाप्रकारे खरेदी करता येतील शेअर्स?

राइट्स इश्यूमध्ये फक्त ठराविक प्रमाणात शेअर्स खरेदी करता येतात. यावेळी भारती एअरटेल कंपनीने राइट्स इश्यूसाठी 1:14 चे प्रमाण निश्चित केले आहे. अर्थाच तुम्हाला भारती एअरटेलच्या प्रत्येक 14 शेअर्ससाठी 1 अतिरिक्त शेअर खरेदी करता येईल. म्हणजेच, तुम्ही शेअरहोल्डर असाल तर प्रत्येक 14 शेअर्समागे एका अतिरिक्त शेअरसाठी अर्ज करू शकाल. राइट्स इश्यूदरम्यान जुन्या शेअरहोल्डर्सना कमी किमतीत शेअर खरेदी करण्याची संधी असते. याकरता कंपनीकडून कालावधी निश्चित केला जातो. तुम्ही या दरम्यान शेअर खरेदी करू शकता.

First published:

Tags: Airtel, Share market