मराठी बातम्या /बातम्या /मनी /Good News! दिवाळी बोनससह मिळणार 18 महिन्यांचा थकित DA, मोदी सरकार लवकरच करणार घोषणा

Good News! दिवाळी बोनससह मिळणार 18 महिन्यांचा थकित DA, मोदी सरकार लवकरच करणार घोषणा

दीड वर्षांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees DA arrears) महागाई भत्त्याचा एरिअर मिळालेला नाही. दरम्यान लवकरच ही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दीड वर्षांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees DA arrears) महागाई भत्त्याचा एरिअर मिळालेला नाही. दरम्यान लवकरच ही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दीड वर्षांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees DA arrears) महागाई भत्त्याचा एरिअर मिळालेला नाही. दरम्यान लवकरच ही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर: दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. पगाराची मोठी रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी शक्यता आहे. दीड वर्षांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees DA arrears) महागाई भत्त्याचा एरिअर मिळालेला नाही. दरम्यान लवकरच ही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मीडिया अहवालांच्या मते, 18 महिन्यांच्या पेंडिंग डीएच्या प्रकरणाबाबत मोदी सरकार (PM Modi on Pending Dearness allowance) लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीआधी तुम्हाला 18 महिन्यांसाठी थांबवण्यात आलेला महागाई भत्ता मिळू शकतो.

पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

इंडियन पेन्शनर्स मंचने पीएम मोदींना केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची थकबाकी देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पीएम मोदींना पत्र लिहून त्यांना या प्रकरणात मदत करण्यास सांगितले आहे.

हे वाचा-ऑक्टोबरमध्ये बंपर कमाईची संधी! Policy Baazar-Nykaa सह 12 कंपन्यांचे येणार IPO

कोरोना संकटामुळे आर्थिक फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांना आता 7 व्या वेतन आयोगानुसार (7th pay commission latest update) मोठा दिलासा मिळाला होता. 1 जुलै 2021 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला आहे. जुलै 2021 मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले होते. डीए आणि डीआर वाढीबरोबरच केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी इतर काही लाभांचीही घोषणा केली आहे.

हे वाचा-सोन्याच्या दरात मोठी घसरण, रेकॉर्ड हायपेक्षा 9400 रुपयांनी स्वस्त आहे सोनं

डीए एरिअरबाबत सरकारने दिली आहे अशी प्रतिक्रिया

नॅशनल काउन्सिल ऑफ जेसीएमचे सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार दीड वर्षांचा डीए एरिअर अद्याप मिळालेला नाही आहे. आता यासंदर्भात सरकारशी बातचीत सुरू आहे. त्यांच्या मते कर्मचाऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता सरकार लवकरच डीएची रक्कम जारी करेल. सरकार आणि केंद्रीय कर्मचारी दोघांचीही मदत होईल असा सुवर्णमध्य शोधला जाईल.

First published:
top videos

    Tags: Central government, Pm modi, PM narendra modi