मुंबई, 12 नोव्हेंबर: शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे अनेक गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मल्टीबॅगर शेअरने देखील जबरदस्त रिटर्न (investment return) दिला आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर (Investment in Share Market) तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक्सचा (Investment in Multibagger stock) विचार करू शकता. एखाद्या गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या रकमेच्या कित्येक पटींनी अधिकचा रिटर्न त्यांना या स्टॉक्सनी दिला आहे. आज आम्ही तुम्हाला रॅडिको खेतानच्या शेअर (Radico Khaitan shares) बद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना कित्येक पटींनी अधिकचा रिटर्न दिला आहे.
8 रुपयांचा शेअर पोहोचला ₹1090 वर
गेल्या 18 वर्षांत, रॅडिको खेतानच्या शेअरची किंमत रु. 8.79 (7 नोव्हेंबर 2003 रोजी NSE वरील बंद किंमत) वरून रु. 1090 (काल NSE वर 11:58 वाजताची किंमत) रु. पर्यंत वाढली आहे. या वाढीनंतर या शेअरमध्ये जवळपास 124 पटींनी वाढ झाली आहे.
हे वाचा-Petrol-Diesel Price Today: आज मुंबईत पेट्रोल 110 रुपयांवर, डिझेलही नव्वदीपार!
Radico Khaitan ची शेअर प्राइस हिस्ट्री
रॅडिको खेतानचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 1022 रुपयांवरून 1090 रुपयांपर्यंत वाढले आहेत. हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या सहा महिन्यांत 570 रुपयांवरुन ₹1090 पर्यंत वाढला आहे, या कालावधीत Radico Khaitan च्या शेअर्समध्ये जवळपास 90 टक्के वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर 462.70 रुपये प्रति शेअरवरून 1090 रुपये प्रति शेअर झाला आहे, ज्यामुळे त्याच्या यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या भागधारकांना सुमारे 135 टक्के परतावा मिळाला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 18 वर्षांत, हा मल्टीबॅगर स्टॉक 8.79 रुपये प्रति शेअरच्या पातळीवरून 1090 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्याच्या भागधारकांना सुमारे 12,300 टक्के रिटर्न मिळाला आहे.
हे वाचा-Business Idea: या व्यवसायासाठी सरकार करेल मदत; महिन्याला लाखोंची कमाई शक्य
जाणून घ्या 1 लाख 1 कोटी कसे झाले?
रॅडिको खेतानच्या शेअरच्या किमतीचा इतिहास पाहता, जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या 1 लाखांचे आज 1.06 लाख झाले असते. दुसरीकडे, जर गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी रॅडिको खेतानच्या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असतील, तर ते आज 1.90 लाखांवर पोहोचले असतील. जर गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर त्या एका लाखाचे आज 2.35 लाख झाले असते.
याचप्रमाणे जर गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 18 वर्षांपूर्वी 8.79 रुपये प्रति शेअर दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ते 1 लाख रुपये 1.24 कोटी रुपये झाले असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Share market