मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM-KISAN: उद्या येणार 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये, असं तपासा या यादीत तुमचं नाव

PM-KISAN: उद्या येणार 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये, असं तपासा या यादीत तुमचं नाव

PM Kisan Scheme: केंद्र सरकार 25 डिसेंबर 2020 अर्थात शुक्रवारी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये  पीएम शेतकरी सन्मान निधीचा पुढील हप्ता पाठवणार आहे. वाचा याबाबत सविस्तर माहिती.

PM Kisan Scheme: केंद्र सरकार 25 डिसेंबर 2020 अर्थात शुक्रवारी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम शेतकरी सन्मान निधीचा पुढील हप्ता पाठवणार आहे. वाचा याबाबत सविस्तर माहिती.

PM Kisan Scheme: केंद्र सरकार 25 डिसेंबर 2020 अर्थात शुक्रवारी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम शेतकरी सन्मान निधीचा पुढील हप्ता पाठवणार आहे. वाचा याबाबत सविस्तर माहिती.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 24 डिसेंबर: केंद्र सरकार 25 डिसेंबर 2020 रोजी अर्थात उद्या शुक्रवारी  9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये  पीएम शेतकरी सन्मान निधीचा पुढील हप्ता (PM Kisan Samman Nidhi Yojana 7th installment) पाठवणार आहे. अशावेळी लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे. जर तुम्ही या योजनेस पात्र आहात तरी देखील तुमचे नाव शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्ही तक्रार करू शकता. मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना सहा हप्त्यांमध्ये मोदी  सरकारने पैसे पाठवले आहेत. गेल्या 23 महिन्यात केंद्र सरकारने 11.17 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 95 कोटी पाठवले आहेत. 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवणार पैसे यावेळी जारी होणाऱ्या पीएम शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याबद्दल बोलताना कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, यावेळी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यासंदर्भात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे  ट्रान्सफर केले जातील. (हे वाचा-यावर्षीच्या अर्थसंकल्पात सरकार मोठी घोषणा करू शकते) अनेकवेळा शेतकऱ्यांच्या बाबतीत असं होतं की, ते पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी रजिस्टर करतात पण त्यांना पैसे मिळत नाहीत. जर तुमच्याबरोबर देखील असा प्रकार घडला असेल तर तुमचं या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का हे तपासणं गरजेचं आहे. घरबसल्या तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता. असं तपासा तुमचं नाव -याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी देखील करू शकता. -याठिकाणी या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला सहजरित्या मिळू शकेल. सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी या वेबसाइटवर अपलोड केली आहे. याठिकाणी तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे देखील समजेल. यासंदर्भातील माहिती तुम्ही किसान आधार नंबर/अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरच्या माध्यमातून देखील मिळवू शकता. -'फार्मर कॉर्नर'वर जाऊन Beneficiary Status च्या लिंकवर क्लिक करा. (हे  वाचा-EDचा कृषी कर्ज घोटाळ्यात रासप आमदाराला झटका, 'गंगाखेड'ची 255 कोटी मालमत्ता जप्त) -याठिकाणी तुम्हाला आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल. -याठिकाणी सरकार लाभार्थ्यांची पूर्ण यादी देखील अपलोड करते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे आधार, बँक डिटेल्स  आणि मोबाइल नंबरच्या साहाय्याने माहित करुन घेऊ शकता यादीमध्ये नाव नसल्यास काय कराल? लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव नसल्यास याची तक्रार तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी हेल्पलाइनवर करू शकता. 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर तुम्हाला कॉल करता येईल. थेट करा कृषी मंत्रालयाशी संपर्क या योजनेबाबत तुम्हाला जर काही समस्या किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कृषी मंत्रालयाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता. पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर: 18001155266 पीएम शेतकरी सन्मान हेल्पलाइन नंबर:155261 (हे वाचा-RBI चा ग्राहकांना इशारा! हे Apps वापरून सहज कर्ज मिळवण्याचा विचार करत असाल तर..) पीएम शेतकरी सन्मान लँडलाइन नंबर्स: 011—23381092, 23382401 पीएम शेतकरी सन्मानची नवी हेल्पलाइन: 011-24300606 पीएम शेतकरी सन्मानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109 ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in
First published:

Tags: PM Kisan, PM narendra modi

पुढील बातम्या