Home /News /money /

2021 च्या अर्थसंकल्पात मोदी सरकार करणार मोठी घोषणा; स्वदेशी उत्पादकांना मिळू शकतो दिलासा

2021 च्या अर्थसंकल्पात मोदी सरकार करणार मोठी घोषणा; स्वदेशी उत्पादकांना मिळू शकतो दिलासा

देशात वैद्यकीय उपकरणांचं उत्पादन (medical equipment manufactures) वाढवण्यासाठी सरकार पुढच्या अर्थसंकल्पात (Budget 2021) मोठी घोषणा करू शकतं.

    नवी दिल्ली, 23 डिसेंबर: देशातील वैद्यकीय उपकरणांचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार अर्थसंकल्पात (Budget 2021) मोठी घोषणा करू शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार, देशामध्ये वैद्यकीय उपकरणांच्या कच्च्या मालाचे आयात शुल्क कमी होण्याची शक्यता आहे. तर तयार उत्पादनांची आयात शुल्क वाढण्याची शक्यता आहे. यामुळं स्वदेशी उत्पादनाच्या किंमती कमी करता येऊ शकतील. त्याचबरोबर आत्मनिर्भर  भारत योजनेंतर्गत जाहीर केलेल्या PLI योजनेत गुंतवणूकही वाढू शकेल. तर चला जाणून घेऊया... आयात शुल्क किती कमी करता येऊ शकेल? CNBC आवाजचे संवाददाता आलोक प्रियदर्शी यांच्या मते, देशात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपकरणांचं उत्पादन घेण्यासाठी केंद्र सरकार अर्थसंकल्पात मोठी घोषणा करू शकते. त्याचबरोबर आयात शुल्काबाबतही काही प्रमाणात बदल केले जाऊ शकतात. बर्‍याच उपकरणांवर शून्य आयात शुल्क आकारले जाते CNBC आवाजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक प्रकारची वैद्यकीय उपकरणं झिरो आयात शुल्कावर आयात केली जातात. म्हणजेच ही उपकरणं आयात करण्यासाठी कोणतेही शुल्क आकरले जात नाही. यामुळं स्वदेशी उत्पादकांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे, कारण हे उत्पादकही या सर्व उत्पादनांची निर्मिती करतात. परंतु आयात करणं खूप स्वस्त असल्यानं या सर्व उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या अर्थसंकल्पात सरकार ही घोषणा करू शकते Contraceptive, Artificial Dialysis Apparatus अशा प्रकारच्या घटकांवर झिरो आयात शुल्क आकरले जाते. पण आतापासून अशा वस्तूंवर 7.5% ते 15% पर्यंत आयात शुल्क आकरण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. यामुळे देशातील उत्पादकांचा उत्पादन खर्च कमी होऊ शकेल आणि त्यांच्या वस्तूंनाही देश-विदेशातही बाजारपेठ मिळू शकेल. या बजेटमध्ये काय बदल होऊ शकतात, ते जाणून घ्या >> वैद्यकीय उपकरणांच्या बाबतीत देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळू शकते >> या अर्थसंकल्पात आयात शुल्कच्या दरात सरकार बदल करू शकते >> झिरो आयात शुल्कावर आयात केल्या जाणऱ्या 20 वस्तूंवर आयात शुल्क वाढवले जाऊ शकते >> Contraceptive, Artificial Dialysis Apparatus, Test kit चाही यामध्ये समावेश असेल >> त्याचबरोबर Blood, Urine, Pregnancy Test kit आणि Lab Chemical >> या 20 वस्तूंवर 7.5% ते 15% पर्यंत आयात शुल्क आकरण्याचा प्रस्ताव  आहे. >> त्याचबरोबर Raw Material च्या आयात शुल्कामध्ये कपात करण्याची शक्यता >> यामध्ये Natural Rubber Latex, Medical Grade Paper, PU Films आदी गोष्टींचा समावेश असेल >> एकूण 14 रॉ मटेरियल अशी आहेत, ज्यात BCD तयार वस्तूंपेक्षा अधिक आहे >> यामुळे देशांतर्गत उत्पादकांना इनवर्टेड ड्यूटीची समस्या भेडसावत आहे कच्च्या मालाच्या आयात शुल्काबाबतही मोठी घोषणा होऊ शकते सध्या कच्च्या मालावर आकरल्या जाणाऱ्या आयात शुल्काबाबतही बोलणी सुरू आहेत. देशात अनेक प्रकारचा कच्चा माल बनतो, ज्यांची उत्पादने आपल्याला बाहेरील देशातून आयात करावी लागतात. या कच्च्या मालावरील बेसिक कस्टम ड्युटी जास्त आहे, तर तयार उत्पादनांवरील आयात शुल्क कमी आहे. यामुळे देशातील उत्पादकांना इन्व्हर्टेड ड्युटीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Narendra modi, Union budget

    पुढील बातम्या