ED ची मोठी कारवाई! कृषी कर्ज घोटाळा प्रकरणात रासप आमदाराला झटका, 'गंगाखेड'ची 255 कोटी मालमत्ता जप्त

सक्तवसुली संचालनालयाने (ED) परभणी जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने गंगाखेड शुगर अँड एनर्जी, योगेश्वरी हॅचरीज (Yogeshwari Hetcheries) आणि गंगाखेड सोलर पॉवर (GSPL) लिमिटेडच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे.

सक्तवसुली संचालनालयाने (ED) परभणी जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने गंगाखेड शुगर अँड एनर्जी, योगेश्वरी हॅचरीज (Yogeshwari Hetcheries) आणि गंगाखेड सोलर पॉवर (GSPL) लिमिटेडच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे.

  • Share this:
    परभणी, 24 डिसेंबर: सक्तवसुली संचालनालयाने (ED) परभणी जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने गंगाखेड शुगर अँड एनर्जी, योगेश्वरी हॅचरीज (Yogeshwari Hetcheries) आणि गंगाखेड सोलर पॉवर (GSPL) लिमिटेडच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे. या कंपन्यांची परभणी, बीड आणि धुळे जिल्ह्यातील तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गंगाखेड येथील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांचा गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड (Gangakhed Sugar and Energy Ltd) हा साखर कारखाना आहे. या साखर कारखान्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी ED कडे तक्रार केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. या तीनही कंपन्यांविरोधात मनी लाँड्रिंग कायद्या (Money Laundering Act) अंतर्गत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या नावे बँक कर्ज घेतल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयाच्या मते, या कारखान्यांविरोधात गरीब शेतकऱ्यांच्या नावे कृषी कर्ज घेऊन घोटाळा केल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधींचे कर्ज घेणाऱ्या कारखान्यांवर ईडीने ही जप्तीची कारवाई केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मते हे प्रकरण 2012-13 ते 2016-17 दरम्यानचे आहे. ईडीने परभणी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये दाखल तक्रारींच्या आधारे मे 2019 मध्ये कंपन्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. (हे वाचा-'या' प्रसिद्ध कंपनीच्या शेअर धारकांना कमाईचा गोल्डन चान्स,11 जानेवारीपर्यंत संधी) ईडीने याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित सिनेमा 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'चे दिग्दर्शक विजय गुट्टे  यांचे वडील आणि गंगाखेडमधील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केली. त्यांच्या विरोधात केलेली ही कारवाई 6 बँकांसमवेत करण्यात आलेल्या 328 कोटींच्या घोटाळ्यात समोर आली होती. ईडीचं असं म्हणणं आहे की, गुट्टे यांनी बँकांकडून कर्ज घेतलं आणि ती रक्कम त्यांनतर गाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेडमध्ये गुंतवली. शिवाय ज्या शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेण्यात आलं होतं, त्यापैकी अधिकतर शेतकरी याच साखर कारखान्यात काम करत होते. (हे वाचा-COVID-19: मोठी बातमी! पुढील आठवड्यात सरकार 'या' लशीला मंजुरी देण्याची शक्यता) बुधवारी रात्री उशिरा ईडीने ही कारवाई केली. या कारवाईत गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेडमधील 247 कोटी किमतींची यंत्र तसंच 5 कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलर पावर लिमिटेडच्या परभणी बीड आणि धुळे याठिकाणी असणाऱ्या बँकांमधील साधारण दीड कोटी रुपये किंमतीच्या गुंतवणूक आणि गंगाखेड शुगर्स लिमिटेडचे एक कोटी दहा लाख रुपयांचे शेअर्स इ. अशी एकूण 255 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने अशी माहिती दिली आहे की, जीएसईपीएलने आंध्रा बँक, यूको बँक, यूनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंटिकेट बँक, रत्नाकर बँक या बँकांकडून 8 ते 10 शेतकऱ्यांच्या नावे कृषी कर्ज घेतलं होतं. कर्जातून मिळालेली रक्कम बनावट शेतकरी किंवा मृत शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली गेली. त्यानंतर ती साखर कारखान्याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. या घोटाळ्याचा मुद्दा धनंजय मुंडे यांनी उचलून धरला होता. गुट्टे यांचे कुटुंब दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: