RBI चा ग्राहकांना इशारा! हे Apps वापरून सहज कर्ज मिळवण्याचा विचार करत असाल तर..

RBI चा ग्राहकांना इशारा! हे Apps वापरून सहज कर्ज मिळवण्याचा विचार करत असाल तर..

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, जर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी अर्ज करत असाल तर सावधान राहा.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 डिसेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) बुधवारी देशभरातील नागरिकांना अलर्ट पाठवला आहे. आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, जर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा मोबाइल अ‍ॅपच्या  (Mobile App) माध्यमातून कर्ज घेण्यासाठी अर्ज करत असाल तर सावधान राहा. यामाध्यमातून तुमच्या कागदपत्रांमध्ये केवळ घोटाळाच केला जात नाही तर उच्च व्याजदराने लोन देखील दिलं जातं. शिवाय या पद्धतीमध्ये पैशांच्या रिकव्हरीचा मार्ग देखील चुकीचा असतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अशा डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा मोबाइल अ‍ॅप्सकडून वैयक्तिक स्वरुपात किंवा छोट्या व्यवसायासाठी अनधिकृत कर्ज घेण्यापासून वाचण्यास सांगितले आहे. असे प्लॅटफॉर्म तुम्हाला त्वरित कर्ज कागदपत्रांशिवाय देण्याचं आश्वासन देतील, पण तुम्ही सावधान राहणं गरजेचं आहे.

जास्त दराने मिळतं लोन

रिझर्व्ह बँकेने अशी माहिती दिली आहे की, या  प्लॅटफॉर्म्सवरून कर्ज घेणाऱ्यांना जास्त दराने व्याज फेडावं लागतं. यामध्ये विविध प्रकारचे छुपे अतिरिक्त शुल्क असतात. शिवाय फोनच्या माध्यमातून तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाण्याचीही भीती असते.

(हे वाचा-Gold Price Today: या आठवड्यात दुसऱ्यांदा उतरले भाव, वाचा काय आहेत बुधवारचे दर)

केंद्रीय बँकेने यावेळी असे म्हटले आहे की, 'सामान्य लोकांना सावध केले जाते आहे की, ऑनलाईन/मोबाईल अ‍ॅपद्वारे कंपनी/ फर्म कर्जाची ऑफर देणाऱ्या अशा बेईमान उपक्रमांची पडताळणी करा'

अनोळखी व्यक्तीला कोणतीही माहिती देऊ नका

ग्राहकांनी त्यांची कोणतीही माहिती विशेषत: केवायसी डॉक्यूमेंट्स कोणत्याही अनोळखी व्यक्तीला, अनधिकृत अॅप्सना देणे चुकीचे आहे. अशी घटना झाल्यास संबंधित एजन्सीकडे तक्रार दाखल करा.

(हे वाचा- पोस्ट ऑफिस बँकेमध्ये झिरो बॅलन्समध्ये सुरू करा खातं, मिनिमम बॅलन्सचं नो टेन्शन)

बँका, आरबीआयमध्ये रजिस्टर्ड नॉन बँकिंग आर्थिक कंपन्या (NBFC) आणि सरकारची मंजुरी असणाऱ्या अन्य संस्था यांच्याकडून तुम्ही अधिकृतपणे कर्ज घेऊ शकता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 24, 2020, 10:41 AM IST

ताज्या बातम्या