मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 2000 रुपये, पैसे मिळाले नसल्यास करा या क्रमाकांवर संपर्क

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 9.13 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,253 कोटी रुपये पाठवले असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 9.13 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,253 कोटी रुपये पाठवले असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 मे : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अशी माहिती दिली की, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 9.13 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,253 कोटी रुपये पाठवले आहेत. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर सरकारने जारी केलेल्या क्रमांकांंवर संपर्क करून तुम्ही त्याबाबत माहिती घेऊ शकता. याच योजनेअंतर्गत सरकारकडून वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पाठवले जातात. सरकारकडून 2000-2000 च्या तीन हप्त्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येत आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही तपासून पाहू शकता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत की नाही. यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत की नाही. (हे वाचा-वन नेशन वन रेशन कार्ड; अर्थमंत्र्यांच्या 9 मोठ्या घोषणा) -जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि योजनेच्या यादीत तुमचं नाव आहे का हे तुम्हाला तपासायचे आहे, तर आता हे काम देखील ऑनलाइन शक्य आहे -pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तपासू शकता -याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही लाभार्थी असाल तर तुमची स्थिती देखील तपासून पाहू शकता. (हे वाचा-शेतकरी आणि मजुरांना Coronavirus संकटातून वाचवण्यासाठी मोठ्या घोषणा) -याठिकाणी या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला सहजरित्या मिळू शकेल. सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी या वेबसाइटवर अपलोड केली आहे. याठिकाणी तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे देखील समजेल. यासंदर्भातील माहिती तुम्ही किसान आधार नंबर/अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरच्या माध्यमातून देखील मिळवू शकता. -'फार्मर कॉर्नर'वर जाऊन 'लाभार्थी सूची' (लाभार्थी यादी) च्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल. (हे वाचा-सरकार कर्मचाऱ्यांना देत आहे 1 लाख 20 हजार? वाचा काय आहे सत्य -यासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी आणि तुमची माहिती अपडेट करण्यासाठी दोन पर्याय आहेत. pmkisan.gov.in या वेबसाइटवरून किंवा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही मोबाइलमध्ये प्ले स्टोअर वरून किसान मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. कुठे कराल तक्रार? या योजनेचे तुम्ही लाभार्थी आहात आणि तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसल्यास तुम्ही केंद्रीय कृषि मंत्रालयाने जारी केलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क करू शकता. खाली दिलेल्या क्रमांकावर आणि मेल आयडीवर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता- -पीएम किसान हेल्पलाइन - 155261 -पीएम किसान टोल फ्री - 1800115526 -पीएम किसान लँड लाइन नंबर- 011-23381092, 23382401 -त्याचप्रमाणे pmkisan-ict@gov.in या मेल आयडीवर मेल करून देखील तक्रार नोंदवू शकता संकलन, संपादन - जान्हवी भाटकर
    First published: