मराठी बातम्या /बातम्या /देश /

सरकार कर्मचाऱ्यांना देत आहे 1 लाख 20 हजार? वाचा काय आहे सत्य

सरकार कर्मचाऱ्यांना देत आहे 1 लाख 20 हजार? वाचा काय आहे सत्य

कामगार व रोजगार मंत्रालय कर्मचार्‍यांना 1.20 लाख रुपये देणार आहे, असा मेसेज काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कामगार व रोजगार मंत्रालय कर्मचार्‍यांना 1.20 लाख रुपये देणार आहे, असा मेसेज काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कामगार व रोजगार मंत्रालय कर्मचार्‍यांना 1.20 लाख रुपये देणार आहे, असा मेसेज काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 14 मे : कोरोनामुळं देशातील आर्थिक स्थिती बिघडली आहे. याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन कपातीला फटका सहन करावा लागला होता. मात्र आता कामगार व रोजगार मंत्रालय (Ministry of Labour and Employment) कर्मचार्‍यांना 1.20 लाख रुपये देणार आहे, असा मेसेज काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 1990 ते 2020 पर्यंत काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कामगार-रोजगार मंत्रालय (Government of India) 1 लाख 20 हजार देणार असल्याचं या मेसेजमध्ये नमुद करण्यात आलं होतं. या व्हायरल मेसेजमध्ये असं म्हटले आहे की सरकारनं कर्मचार्‍यांची यादी जाहीर केली आहे. सूचीमध्ये आपले नाव पाहण्यासाठी, आपल्याला संदेशामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल. मात्र पीआयबी फॅक्ट चेकमध्ये (PIB Fact Check) हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. वाचा-Fact Check: सरकार बेरोजगारांना प्रत्येक महिन्यात देणार 3500 रुपये? खरं की खोटं 1.20 लाख रुपयांचा दावा व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये 1990 ते 2020 या काळात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून 1 लाख 20 हजार रुपये मिळणार असल्याचा हा मेसेज खोटा असल्याचे समोर आले आहे. सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही, असंही पीआयबीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. वाचा-प्रत्येक शहरात सरकार हेलिकॉप्टरमधून टाकणार पैसे? हे आहे व्हायरल मेसेज मागचे सत्य काय आहे सत्य? PIB Fact Checkने हा व्हायरल मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे. सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. 1.20 लाख रुपये कर्मचार्‍यांना देण्यात येणार नाही आहेत. अशा मेसेजबद्दल सावध रहा, अन्यथा तुम्हाला मोठ्या नुकसानास सामोरं जावं लागू शकते. वाचा-'या' 10 राज्यांनी वाढवली सरकारची चिंता, असा आहे महाराष्ट्रातील रुग्णांचा ग्राफ
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या