नवी दिल्ली, 14 मे : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक पॅकेजसंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये शेतकरी आणि मजुरांबरोबर छोट्या दुकानदारांसाठी भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर त्याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) योजना सादर केल्या होत्या. आता शेतकरी आणि छोट्या दुकानदारांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
#WATCH Live from Delhi: FM Nirmala Sitharaman briefs the media #Economicpackage https://t.co/3ASwSmdCE8
— ANI (@ANI) May 14, 2020
अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे शेतकरी आणि मजुरांसाठी 9 मोठ्या घोषणा केल्या. 3 कोटी शेतकऱ्यांना 4.22 लाख कोटींचं कर्ज दिलं आहे. त्यांना पुढचे सहा महिने कर्जाची परतफेड केली नाही तरी चालणार आहे. कृषी क्षेत्रासाठी एकूण 86,600 कोटी रुपयांचं ऋण देण्याची योजना आहे. पीककर्जावर व्याजदरात सवलत देणं सुरूच राहणार 25 लाख नवी किसान क्रेडिट कार्ड लोन दिली गेली आतापर्यंत मजूर आणि स्थलांतरित कामगारांसाठी 11000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. सहकारी आणि स्थानिक पतसंस्था आणि बँकांना मदत करणार. त्यासाठी 25,500 कोटींची तरतूद राज्यांना पीकखरेदीसाठी 6700 कोटी दिले. मार्चमध्ये 4200 कोटी रुपयांचं ग्रामीण इन्फ्रा फंड देण्यात आला. शहरातल्या गरिबांना मदत करण्याकरता 7200 बचत गट स्थापन करण्यात आले. संकटकाळात या बचतगटांच्या माध्यमातून मास्क आणि सॅनिटायझर निर्णिती झाली.
12,000 self-help groups (SHGs) have produced more than 3 crore masks and 1.2 lakh litres of sanitizers during #COVID19 period. 7,200 new SHGs for urban poor have been formed during the last two months: FM Nirmala Sitharaman pic.twitter.com/l7AFedNofV
— ANI (@ANI) May 14, 2020
अन्य बातम्या छोट्या करदात्यांना मोठा दिलासा; करकपात कमी, इनकम टॅक्स भरण्याची मुदतही वाढली लॉकडाऊनमुळे अनेकांची नोकरी धोक्यात असताना विद्यार्थ्याला मिळालं 41 लाखांच पॅकेज