Home /News /money /

तुम्ही PAN कार्ड संबंधित ही चूक केली आहे? द्यावा लागेल 10,000 रुपयांचा दंड

तुम्ही PAN कार्ड संबंधित ही चूक केली आहे? द्यावा लागेल 10,000 रुपयांचा दंड

पॅन (Permanent Account Number) संदर्भात तुम्ही दिलेली एक चुकीची माहिती तुम्हाला खूप महाग पडू शकते. त्याकरता तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

    नवी दिल्ली, 15 जून : बहुतांश बँकिंग व्यवहार आणि अन्य आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 10 डिजिटचा पॅन नंबर असणे आवश्यक आहे. तुमच्या कडे पॅन कार्ड (PAN Card) असल्यास तुमची अनेक आवश्यक काम सोप्या पद्धतीने पूर्ण होतील. मात्र पॅन (Permanent Account Number) संदर्भात तुम्ही दिलेली एक चुकीची माहिती तुम्हाला खूप महाग पडू शकते. त्याकरता तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड आहेत, तर त्याला दुसरे कार्ड सरेंडर म्हणजे जमा करणे आवश्यक आहे. असं न केल्यास दंड तर द्यावा लागेलच पण त्याचबरोबर कायदेशीर कारवाईला देखील सामोरे जावे लागेल. अर्ज करतेवेळी माहिती भरताना सावधान पॅन कार्डसाठी अर्ज करताना चुकीची माहिती भरल्यास त्या व्यक्तीला आयकर विभागाच्या आयकर कायदा 1962 च्या सेक्शन 272 (B) अंतर्गत 10,000 रुपयांचा दंड बसू शकतो. (हे वाचा-सोन्याच्या या योजनेत गुंतवला जातोय पैसा, मे महिन्यातच झाली 815 कोटींची गुंतवणूक) त्याचप्रमाणे चुकीची माहिती दिल्या प्रकरणी आयकर विभाग तुमचे पॅन कार्ड रद्द देखील करू शकतात. पॅन कार्डमध्ये एकही चूक आढळून आल्यास कार्ड धारकाविरोधात कारवाई होऊ शकते. त्यामुळे अर्ज करताना सावधानता बाळगून करणे याकडे लक्ष दिले पाहिजे. कसं कराल पॅन सरेंडर? एखाद्या व्यक्तीने पॅन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर काही वेळा ते त्याच्यापर्यंत पोस्टल किंवा अन्य मार्गांनी पोहोचण्यास उशीर होतो. अशावेळी काही ग्राहक याबाबत चौकशी न करता पॅन कार्डसाठी दुसरा अर्ज करतात. काही परिस्थितींमध्ये या ग्राहकांना दोन्ही पॅन कार्ड मिळतात. अशावेळी दुसरं पॅनकार्ड आयकर विभागाकडे सरेंडर करणं आवश्यक आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तुम्ही तुमचे कार्ड जमा करू शकता. ऑनलाइन सरेंडर करण्यासाठी आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर तुम्हाला लॉग इन करावे लागेल. (हे वाचा-अलर्ट! 30 जूनपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचा हा नियम, वाचा सविस्तर) त्यानंतर या वेबसाइटच्या होम पेजवरील Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Data' यावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म डाऊनलोड होईल. यामध्ये योग्य माहिती भरून तो फॉर्म पॅन कार्डसह जवळच्या NSDL कार्यालयात जमा करावा लागेल. https://www.tin-nsdl.com/pan-center.htm या लिंकवर तुम्ही जवळच्या कार्यालयाबाबत माहिती मिळवू शकता. (हे वाचा- कोरोनाच्या संकटकाळात सोने कर्ज ठरेल सोयीचं, बँक आणि ग्राहकांना होणार फायदा) ऑनलाइन सरेंडर करण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरल्यानंतर पॅन कार्डाची स्कॅन कॉपी सबमिट करावी लागेल संपादन- जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Pan card

    पुढील बातम्या