नवी दिल्ली, 14 जून : कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडोवनमध्ये अनेक व्यवहार पूर्णपणे ठप्प होते. छोटया छोट्या व्यवसायिकांनापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वाना याचा फटका सहन करावा लागला आहे. कर्ज घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती देखील बिकट आहे. देण्यात येणाऱ्या कर्जामुळे बँकांना त्यांच्या नॉन परफॉरमिंग असेट्समध्ये वाढ होण्याची भीती आहे. अशावेळी बँका सोन्यावर कर्ज (Gold Loan) देण्यावर भर देत आहेत. जाणून घेऊयात का गोल्ड लोनचा ग्राहकांना काय फायदा होऊ शकतो. सोन्याच्या दागिन्यांवर दिलेले कर्ज बँका सुरक्षित मानतात. तज्ज्ञांच्या मते कर्ज घेणाऱ्यांचे सोने बँकेकडे असल्याने ईएमआय चुकवला जाण्याची शक्यता कमी असते. कर्ज बुडण्याची शक्यता निर्माण झाल्यास बँक त्यांच्याकडे जमा असलेल्या सोन्याच्या माध्यमातून कर्जवसुली करते. त्यामुळे अत्यंत कमी वेळात हे कर्ज उपलब्ध होते. (हे वाचा- विवाहित असूनही प्रेमात पडली अभिनेत्री, पहिल्या पतीशी घटस्फोट घेत केलं दुसरं लग्न ) दरम्यान कोरोना व्हायरस पँडेमिक काळात अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना कर्जाची गरज भासते आहे. मात्र कर्ज काढण्यासाठी अनेक औपचारिकता पार पाडाव्या लागतात. बँकेचे खेटे देखील घालावे लागतात. अशावेळी तुमचे घरी पडून असलेले सोनं कामी येऊ शकते. सोने गहाण ठेवत असल्याने कर्ज लवकर मिळण्याची शक्यता अधिक आहे. सामान्यत: स्वस्त व्याजदरांने सोने कर्ज उपलब्ध होते. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या भारतीय ऑपरेशन्सचे प्रमुख असणारे सोमसुंदरम म्हणतात की, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली जमापूंजी वाढवण्यासाठी ग्राहकांकडे गोल्ड लोन हा चांगला पर्याय आहे. एसबीआयसह अनेक सरकारी बँका तसंच खाजगी बँका सोने कर्ज उपलब्ध करून देत आहेत. 20 लाखांपर्यंतचे गोल्ड लोन एसबीआय कडून देण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.