Home /News /money /

मोठ्या फायद्यासाठी सोन्याच्या या योजनेत गुंतवला जातोय पैसा, मे महिन्यातच 815 कोटींची गुंतवणूक

मोठ्या फायद्यासाठी सोन्याच्या या योजनेत गुंतवला जातोय पैसा, मे महिन्यातच 815 कोटींची गुंतवणूक

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात शेअर बाजारात चढ-उतार सुरू असताना मे महिन्यामध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF)मध्ये 815 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

    नवी दिल्ली, 14 जून : कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात शेअर बाजारात चढ-उतार सुरू असताना मे महिन्यामध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF)मध्ये 815 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एक सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते. गेल्या वर्षी देखील अन्य पर्यांपेक्षा गोल्ड इटीएफमध्ये अधिक गुंतवणूक करण्यात आली होती. ऑगस्ट 2019 मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये एकूण 3,299 कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती. असोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स इन इंडिया (Amfi)च्या आकड्यांनुसार मे महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक 815 कोटींची आहे. एप्रिल महिन्यात यामध्ये केली गेलेली गुंतवणूक 731 कोटींची होती. (हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात सोने कर्ज ठरेल सोयीचं, बँक आणि ग्राहकांना होणार फायदा) मार्चमध्ये 195 कोटी, फेब्रुवारी मध्ये 1,483 कोटी तर जानेवारीमध्ये 202 कोटींची गुंतवणूक Gold ETF मध्ये करण्यात आली होती. का वाढली सोन्यामधील गुंतवणूक ? 'ग्रो'चे सह-संस्थापक आणि मुख्य परिचालन अधिकारी हर्ष जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस पँडेमिक देशात येण्याआधीच्या महिन्यांपेक्षा गोल्ड ईटीएफमध्ये मे महिन्यात गुंतवणूक वाढली आहे. बाजारातील चढ-उतार हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. मॉर्निंग स्टार इनव्हेस्टमेंट अॅडवाइजर इंडियाचे वरिष्ठ शोध विश्लेषक हिमांशु श्रीवास्तव यांनी देखील अशी प्रतिक्रिया दिली की, कोरोना व्हायरसमुळे देशभरातील बाजार प्रभावित झाले आहेत. परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असणाऱ्या या काळात सोने चांगल्या गुंतवणुकीचे साधन बनले आहे. (हे वाचा-अलर्ट! 30 जूनपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचा हा नियम, वाचा सविस्तर) 2013 नंतर फीजिकल गोल्ड व्यतिरिक्त इतर पर्यायांमध्ये देखील गुंतवणूक वाढली आहे. कारण आता ग्राहकांना पेपर गोल्डचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईशिवाय ग्राहकांसमोर गोल्ड डिलीव्हरीचा देखील पर्याय आहे. गुंतवणुकदारांव्यतिरिक्त सामान्य नागरिक देखील पेटीएम गोल्ड, सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड, गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करून या योजनांचा फायदा घेत आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या