अलर्ट! 30 जूनपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचा हा नियम, वाचा सविस्तर

अलर्ट! 30 जूनपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचा हा नियम, वाचा सविस्तर

लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर 3 महिन्यांसाठी ATMमधून पैसे काढण्यासंदर्भातील काही नियमांमध्ये सूट दिली होती. बचत खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक ठेवण्याबाबतही सूट देण्यात आली होती. सरकारने दिलेली ही सूट जून महिन्यामध्ये संपत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जून : देशभरात कोरोना व्हायरस (Coronavirus)चे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी 24 मार्च  रोजी अशी घोषणा केली होती की, 3 महिन्यांकरता एटीएम चार्जेज हटवण्यात येतील. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर नागरिकांना कोणत्याही बँकेच्या एटीएमधून पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शूल्क देण्याची आवश्यकता नव्हती. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांकरता ही सूट देण्यात आली आहे. जून महिन्यात ही सूट संपणार आहे, मात्र अद्याप याची डेडलाइन वाढवण्यासंदर्भात कोणतीही घोषणा केंद्र सरकार किंवा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आलेली नाही.

एटीएम शूल्कासंदर्भात घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी बचत खात्यातील कमीत कमी शिल्लक ठेवण्याच्या नियमातही सूट दिली होती. तीन महिन्यांकरता ही सूट देण्यात आली होती.

(हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात सोने कर्ज ठरेल सोयीचं, बँक आणि ग्राहकांना होणार फायदा)

पैसे काढण्यासाठी कमीत कमी नागरिक बँक शाखांमध्ये जावेत याकरता काही डिजीटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्याबाबतची घोषणाही यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर (Anurag Singh Thakur) यांनी केली होती.

खात्यामध्ये कमीत कमी रक्कम नसल्यास SBI नाही आकारणार शूल्क

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने 11 मार्चपासूनच त्यांच्या ग्राहकांसाठी खात्यामध्ये कमीतकमी रक्कम ठेवण्याची अनिवार्यता रद्द केली होती. SBI ने 44.51 कोटी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक नसल्यास शूल्क आकारण्याच्या नियमाची अनिवार्यता रद्द केली होती. याआधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहरी भागातील खातेधारकांच्या खात्यांमध्ये 3000 रुपये असणं बंधनकारक होते. ही कमीत कमी रक्कम निमशहरी आणि ग्रामीण भागात अनुक्रमे 2000 रुपये तर 1000 रुपये इतकी होती. मीनिमम बॅलेन्स नसल्यास 5 ते 15 रुपयांपर्यंतचा टॅक्स बँकेकडून वसूल केला जाई.

काय एटीएम ट्रान्झॅक्शनसाठीचा नियम?

शक्यतो बँकेच्या एटीएममधून 5 वेळा पैसे काढल्यास बँका कोणतेही शुल्क आकारत नाहीत. दुसऱ्या बँकांसाठी ही मर्यादा 3 ट्रान्झॅक्शन इतकी आहे. या मर्यादेपेक्षा अधिक वेळा एटीएममधून पैसे काढल्यास 8 ते 20 रुपयांपर्यंतचे शुल्क आकारले जाते.

First published: June 14, 2020, 2:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading