मुंबई : तुम्ही अजूनही पॅन आधार लिंक केलं नसेल तर तुमच्याकडे 25 दिवस फक्त शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या साइटवर जाऊन देखील तुमचं आधार पॅन लिंक आहे की नाही ते पाहू शकता. आता तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे. जर तुम्ही लिंक केलं नाही तर तुमचं पॅनकार्ड बंद होईल. याशिवाय 10 हजार रुपयांचा दंड देखील बसेल. तुम्हाला आयकर भरता येणार नाही. बँकेच्या कामात अडथळे येतील. याच सगळ्यात आता सरकारकडून एक दिलासा मिळाला आहे. पॅन आणि आधारकार्डमध्ये काही लोकांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला ही सूट मिळणार की नाही ते चेक करून घ्या.
‘ही’ कामं केली नसतील तर आत्ताच करा! अन्यथा होईल मोठे नुकसान, 31 मार्च आहे डेडलाईनआयकर विभागाने म्हटलं आहे की हे आवश्यक आहे, त्यामुळे वाट पाहात बसू नका, आजच लिंक करा! आयटी कायद्यानुसार, हे सर्व पॅन धारकांसाठी अनिवार्य आहे. जर लिंक केलेलं नसेल तर तुमचं पॅनकार्ड 1 एप्रिलपासून बंद होणार आहे.
आयकर कायदा 1961 च्या कलम 139AA नुसार, जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर ते 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय होईल. केंद्रीय वित्त मंत्रालयाने मे 2017 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पॅन-आधार लिंकमध्ये चार श्रेणी आहेत, ज्यांना सूट देण्यात आली आहे.
पॅन कार्डवरील अॅड्रेस चेंज करायचाय का? फॉलो करा या सिंपल स्टेप्सआसाम, मेघालय किंवा जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांना त्याची गरज नाही. आयकर कायदा, 1961 नुसार अनिवासी, गेल्या वर्षभरात 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांनाही लिंक करण्याची गरज नाही असं सांगण्यात आलं आहे. याशिवाय भारतीय नागरिक नसेल तर लिंक करणं आवश्यक असणार नाही.