मराठी बातम्या /बातम्या /मनी /नारायण मूर्ती आणि Amazon ची संयुक्त कंपनी 'कर विवादा'त, 5.5 दशलक्ष पाउंड शुल्क भरण्याची नोटीस- अहवाल

नारायण मूर्ती आणि Amazon ची संयुक्त कंपनी 'कर विवादा'त, 5.5 दशलक्ष पाउंड शुल्क भरण्याची नोटीस- अहवाल

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) आणि अमेरिकेतली दिग्गज रिटेलर कंपनी असलेली अॅमेझॉन (Amazon) यांचा संयुक्त उपक्रम (Joint Venture) असलेल्या कंपनीने भारतीय कर यंत्रणेच्या नियमांतून पळवाट काढल्याचा आरोप केला जात आहे.

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) आणि अमेरिकेतली दिग्गज रिटेलर कंपनी असलेली अॅमेझॉन (Amazon) यांचा संयुक्त उपक्रम (Joint Venture) असलेल्या कंपनीने भारतीय कर यंत्रणेच्या नियमांतून पळवाट काढल्याचा आरोप केला जात आहे.

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) आणि अमेरिकेतली दिग्गज रिटेलर कंपनी असलेली अॅमेझॉन (Amazon) यांचा संयुक्त उपक्रम (Joint Venture) असलेल्या कंपनीने भारतीय कर यंत्रणेच्या नियमांतून पळवाट काढल्याचा आरोप केला जात आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 15 जून: भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातलं मोठं नाव असलेले, इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) आणि अमेरिकेतली दिग्गज रिटेलर कंपनी असलेली अॅमेझॉन (Amazon) यांचा संयुक्त उपक्रम (Joint Venture) असलेल्या कंपनीने भारतीय कर यंत्रणेच्या नियमांतून पळवाट काढल्याचा आरोप केला जात आहे. भारतीय यंत्रणांकडून त्या कंपनीकडे तब्बल साडेपाच दशलक्ष पाउंड  एवढ्या कराची मागणी करण्यात आली आहे; मात्र त्याबद्दल कंपनीकडून खटला लढवला जात आहे. भारतातल्या कॉम्पिटिशन कमिशनने या संदर्भात अॅमेझॉनची पुन्हा चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. ब्रिटनमधल्या गार्डियन या वृत्तपत्राने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

UK चॅन्सेलर ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचे सासरे म्हणजे एन. आर. नारायण मूर्ती. अॅमेझॉन या कंपनीशी वार्षिक एक अब्ज पाउंडांचा करार करून त्यांनी एक कंपनी उभी केली आहे. या कंपनीच्या कारभारामुळे परदेशी मालकीसंदर्भातल्या भारतीय नियमांचं उल्लंघन होत असल्याची शक्यता आहे. तसंच, छोट्या व्यापाऱ्यांनी त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा दावा केला आहे, असं गार्डियनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटलं आहे; मात्र आपण स्थानिक नियमांचं संपूर्णपणे पालन केलं असल्याचं अॅमेझॉनचं म्हणणं आहे.

हे वाचा-विश्वनाथन आनंदसह 'चीटिंग' करत जिंकले Zerodha चे को-फाउंडर,घटनेनंतर होतायंत ट्रोल

गेल्या आठवड्यात झालेल्या जी-7 देशांच्या चर्चेत जगातल्या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांच्या अर्थमंत्र्यांनी तंत्रज्ञान कंपन्यांना अधिक कर भरावा लागेल, अशा पद्धतीच्या जागतिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर अॅमेझॉन आणि नारायण मूर्ती यांच्या संयुक्त उपक्रमाच्या कराचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.

मालाची साठवणूक करून ऑनलाइन किरकोळ विक्री करण्यास परदेशी कंपन्यांना भारतात बंदी आहे. त्यामुळे Amazon.in ही वेबसाइट मार्केटप्लेस (Marketplace) म्हणून चालवली जाते. तिथे भारतीय किरकोळ विक्रेते त्यांची प्रोडक्ट्स उपलब्ध करतात. त्या माध्यमातून विक्री झाल्यास अॅमेझॉनला ते शुल्क मोजतात.  Amazon.in वर जे विक्रेते आहेत, त्यापैकी Cloudtail ही सर्वांत मोठी कंपनी आहे. नारायणमूर्ती यांच्या कुटुंबीयांतर्फे चालवल्या जाणाऱ्या इन्व्हेस्टमेंट फर्मची या क्लाउडटेल कंपनीत 76 टक्के गुंतवणूक आहे. उर्वरित 24 टक्के गुंतवणूक अॅमेझॉनचीच आहे.

हे वाचा-पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी गाठला उच्चांक, 25 दिवसात एवढं महागलं इंधन

या कंपनीतल्या चीफ एक्झिक्युटिव्ह आणि फायनान्स डायरेक्टर या दोन सर्वोच्च पदांवर अॅमेझॉनचीच माणसं नेमण्यात आली आहेत. तसंच, प्रिओन ही क्लाउडटेलची होल्डिंग कंपनीही अॅमेझॉनच्या माजी मॅनेजर्सकडूनच चालवली जाते.

क्लाउडटेलने गेल्या चार वर्षांत अगदी अल्प प्रमाणात टॅक्स भरला असून, व्याज आणि दंड या रूपाने  'डायरेक्टोरेट जनरल ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इंटेलिजन्स'कडून 5545 लाख म्हणजेच 5.5 दशलक्ष पाउंड एवढं शुल्क भरण्याची नोटीस बजावली आहे. क्लाउडटेलच्या ताज्या अकाउंट्स नोटमध्येही अशी कारणे दाखवा नोटीस आल्याचा उल्लेख आहे.

कराबद्दलचा हा वाद (Tax Dispute) नेमका कशाबद्दल आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही, असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं.

First published:
top videos

    Tags: Amazon, Business News, Investment, Money, Tax