विश्वनाथन आनंदसह 'चीटिंग' करत जिंकले Zerodha चे को-फाउंडर, घटनेनंतर होतायंत ट्रोल

विश्वनाथन आनंदसह 'चीटिंग' करत जिंकले Zerodha चे को-फाउंडर, घटनेनंतर होतायंत ट्रोल

कोव्हिडसाठी फंड जमा करण्यासाठी एक चेस इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यामध्ये ही घटना घडली. जेरोधाचे सहसंस्थापक यांनी या घटनेबाबत माफी देखील मागितली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून: बुद्धिबळ खेळणं तसं सोपं नाही आहे. हा खेळ जिंकण्यासाठी तल्लख बुद्धी आणि अनुभवच कामी येतो. अशावेळी चेसमधील ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदबरोबर (Viswanathan Anand) खेळणं आणि त्यांना हरवणं अनेकांसाठी अशक्यप्राय आहे. Zerodha चे को-फाउंडर आणि सीईओ निखिल कामत (Nikhil Kamath) विश्वनाथन आनंद यांना जेव्हा एका चेस इव्हेंटमध्ये या खेळात हरवलं होतं, त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

दरम्यान निखिल यांनी स्वत: खुलासा केला आहे की त्यांनी हा खेळ चीटिंग करत जिंकला होता आणि त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. ज्या इव्हेंटमध्ये निखिल यांनी ग्रँडमास्टर आनंद यांना हरवलं होतं तो एक चॅरिटी कार्यक्रम होता, जो कोव्हिड मदतनिधीसाठी आयोजित करण्यात आला होता. यानंतर निखिल यांना अनेकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान निखिल यांनी ट्वीट करत माफी देखील मागितली आहे. कामत यांना Chess.com द्वारे फसवणूक केल्यामुळे बॅन करण्यात आलं आहे.

हे वाचा-WTC Final : विजयी टीमला विराटच्या IPL पगारापेक्षाही कमी पैसे मिळणार

वापरली ही ट्रीक

कामत यांनी जारी केलेल्या एका निवेदनात असं म्हटलं आहे की, असा विचार करणं मूर्खपणाचं ठरेल की मी खरंच बुद्धिबळाच्या खेळात विशी सरांना हरवलं. हे असं विचार करणं होईल की मी सकाळी उठलो आणि 100 मीटर धावण्यात उसैन बोल्टला हरवलं. त्यांनी अशी माहिती दिली या स्पर्धेत त्यांनी स्पर्धेचं विश्लेषण करणाऱ्या काही लोकांची, कम्प्युटरची मदत घेतली आणि आनंद सरांच्या उदारतेमुळे हा गेम जिंकल्याचं ते म्हणतात. ते पुढे म्हणाले की, हा खेळ फन आणि चॅरिटीसाठी होता, मला माहित नव्हतं यामुळे एवढा मोठा गोंधळ होईल. त्यांनी याकरता माफी देखील मागितली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 15, 2021, 9:41 AM IST

ताज्या बातम्या