Home /News /money /

कोरोनाच्या भीषण परिस्थितीत नोकरदारांसाठी खूशखबर! EPF खात्यातून काढू शकाल एवढी रक्कम

कोरोनाच्या भीषण परिस्थितीत नोकरदारांसाठी खूशखबर! EPF खात्यातून काढू शकाल एवढी रक्कम

कामगार मंत्रालयाकडून (Ministry of Labour) EPFO विशेष परवानगी दिली आहे. यानुसार EPFOचे 6 कोटी मेंबर्स त्यांच्या EPF अकाउंटमधून 3 महिन्यांएवढा पगार आणि महागाई भत्ता काढून घेऊ शकतात.

    नवी दिल्ली, 29 मार्च : देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी कोरोनाचा येत्या काही दिवसातमध्ये धोका वाढण्याची दाट शक्यता आहे. पुढचे काही दिवस कोरोनाचं संकट रोखून धरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. देशभरामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. दरम्यान कोरोनाशी लढा देण्यासाठी विविध उपाययोजना सरकारकडून आखल्या जात आहेत. अशावेळी कामगार मंत्रालयाकडून (Ministry of Labour) EPFO विशेष परवानगी दिली आहे. (हे वाचा- लॉकडाऊनमुळे सोन्याच्या किंमतीवर 6 महिन्यातील सर्वाधिक सूट, व्यवहार मात्र ठप्पच!) यानुसार EPFOचे 6 कोटी मेंबर्स त्यांच्या EPF अकाउंटमधून 3 महिन्यांएवढा पगार आणि  महागाई भत्ता काढून घेऊ शकतात. 28  मार्चला मंत्रालयाकडून Employee Provident Fund 1952 मध्ये केलेल्या सुधारणेबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. किती रक्कम काढण्यास मिळणार मंजूरी? देशभरातील कोरोनाचं वाढणारं संकट लक्षात घेता, EPFO सब्सक्रायबर्स त्यांच्या EPF अकाउंटमधून 3 महिन्याचा मूळ पगार (basic salary) आणि महागाई भत्त्याएवढी रक्कम किंवा तुमच्या खात्यामध्ये असणाऱ्या रकमेच्या 75 टक्के रक्कम काढू शकतात. 28 मार्चपासून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या नोटिफिकेशननंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांना नोटीस धाडली आहे. कर्मचाऱ्यांनी रक्कम काढण्यासाठी क्लेम केल्यास त्याला मान्यता देण्याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. अन्य बातम्या घरबसल्या करू शकाल PM CARE Fund मधून गरजूंना मदत,डोनेशनच्या रकमेवर टॅक्समध्ये सूट लॉकडाऊनमुळे LPGचं 'पॅनिक बुकिंग' नको, देशात पुरेसा साठा असल्याची IOCची माहिती लॉकडाऊनमध्ये बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, मिळणार जास्त पगार
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या