नवी दिल्ली, 29 मार्च : गुढीपाडव्यापासून भारतामध्ये 21 दिवसांच्या लॉकडाऊनची सुरूवात केली. 3 आठवड्यांचा लॉकडाऊन काळापेक्षाही जास्त दिवस पुरेल इतका पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस (LPG)चा साठा असल्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC)चे चेअरमन संजीव सिंह यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यात इंधन पोहोचले आहे. त्यामुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊन काळात ग्राहकांनी एलपीजी गॅस रिफिल करण्यासाठी गर्दी करू नये. (हे वाचा- लॉकडाऊनमध्ये बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, मिळणार जास्त पगार ) सिंह यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ‘संपूर्ण एप्रिल महिना आणि त्यापुढेही पुरेल एवढ्या इंधनाचा आराखडा आम्ही तयार केला आहे. या इंधनाच्या मागणीसाठी सर्व ठिकाणी रिफायनरी कार्यरत आहेत. ज्याठिकाणी बल्क स्टोरेज पॉईंट्सशिवाय, एलपीजी केंद्र आणि पेट्रोल पंपावर नेहमीप्रमाणेच काम सुरू आहे. कोणत्याही प्रकारच्या इंधनाची कमतरता नाही आहे.’ (हे वाचा- 8 कोटी महिलांना 3 महिन्यासाठी मिळणार मोफत सिलेंडर, केंद्र सरकारची मोठी घोषणा) देशभरात झालेला लॉकडाऊनमुळे मोठे उद्योग ठप्प झाले आहेत, फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत, ट्रेन्स थांबल्या आहेत आणि जवळपास सर्वच महत्त्वाच्या हालचालींवर बंधन आली आहेत. याचा परिणाम पेट्रोल, डिझेल आणि अव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) या इंधनाच्या मागणीवर झाला आहे. या इंधनांच्या मागणीत घट झाली आहे. कमीत कमी गाड्या रस्त्यावर धावत असल्याने ही घट झाली आहे. मार्चमध्ये पेट्रोलची मागणी 8 टक्क्यांनी तर डिझेलची मागणी 16 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर ATFची मागणी 20 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती सिंह यांनी दिली आहे. (हे वाचा- लॉकडाऊनमध्ये SBI चे 90 टक्के एटीएम सुरू, वाचा पैसे काढताना कोणती खबरदारी घ्याल दरम्यान एलपीजीबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ‘मात्र एलपीजीचा वापर वाढत आहे आणि आम्ही सर्व ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देत आहोत.’ त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनमुळे LPGच्या मागणीत 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अनेकांनी परिस्थितीला घाबरून ‘पॅनिक बुकिंग’ केल्याचंही सिंह म्हणाले. अशाप्रकारे बुकिंग करण्याची कोणतीही आवश्यकता आहे. अतिरिक्त रिफिल करणे, बल्क स्टोरेज असणाऱ्या जागेपर्यत सिलिंडर पोहोचवणे आणि त्यानंतर डिस्ट्रीब्युटरकडे पोहोचवणे यांसारख्या प्रक्रिया त्वरित कराव्या लागतात. यामुळे संपूर्ण व्यवस्थेवर ताण पडतो, असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.