जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कोरोनाविरोधात लढण्यासाठी अशी कराल PM CARE Fund मधून मदत, डोनेशनच्या रकमेवर टॅक्समध्ये सूट

कोरोनाविरोधात लढण्यासाठी अशी कराल PM CARE Fund मधून मदत, डोनेशनच्या रकमेवर टॅक्समध्ये सूट

कोरोनाविरोधात लढण्यासाठी अशी कराल PM CARE Fund मधून मदत, डोनेशनच्या रकमेवर टॅक्समध्ये सूट

देशात मास्क, सॅनिटायझर आणि व्हेंटिलेटर्सपासून अनेक प्रोटेक्टिव्ह संसाधनांची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी PM Care Fund ची घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा वाढत आहे. संपूर्ण जगात भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरात एकूण 5 लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीननंतर आता इटली आणि स्पेनमधील स्थिती भयावह आहे. यूरोप आणि अमेरिकेतील परिस्थितीही हाताबाहेर जात आहे. भारतात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याचप्रमाणे विविध घोषणांच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांचा देशाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. (हे वाचा- लॉकडाऊनमुळे LPGचं ‘पॅनिक बुकिंग’ नको, देशात पुरेसा साठा असल्याची IOCची माहिती ) देशाला कोरोनाशी लढण्यासाठी मनोबल तर हवंच आहे, पण त्याचबरोबर गरज आहे ती आर्थिक मदतीची. देशातील अनेक मोठ्या उद्योगपतींनी मदतीचा हात पुढे केला आहे. देशात मास्क, सॅनिटायझर आणि व्हेंटिलेटर्सपासून अनेक प्रोटेक्टिव्ह संसाधनांची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी PM Care Fund ची घोषणा केली, ज्यामध्ये देशातील प्रत्येक नागरिक स्वेच्छेने काही आर्थिक मदत करू शकतो. या योजनेतून 100 कोटी जमा करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक गरजूंसाठी आर्थिक मदत गोळा करण्यात येत आहे.

जाहिरात

(हे वाचा- लॉकडाऊनमध्ये बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, मिळणार जास्त पगार ) जाणून घ्या तुम्ही कशी यामध्ये आर्थिक मदत करू शकाल. तुम्ही घरबसल्या काही मिनिटांमध्ये ही मदत करू शकाल. विविध मार्गांनी तुम्ही हे डोनेशन करू शकता. pmindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन केअर फंडमध्ये आर्थिक मदत देऊ शकता. यासंदर्भातील माहिती- अकाउंटचं नाव: PM CARES अकाउंट नंबर: 2121PM20202 IFSC कोड: SBIN0000691 SWIFT कोड: SBININBB104 (हे वाचा- RBI कडून 3 महिन्याच्या EMI वर सूट, जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ) बँक आणि ब्रँचचे नाव: State Bank of India, New Delhi Main Branch UPIच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पंतप्रधान केअर फंडमध्ये डोनेट करू शकता. यासाठी UPI अपमध्ये जाऊन pmcares@sbi यावर रक्कम पाठवावी लागेल. आर्थिक मदत करण्याचे आणखी मार्ग डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, UPI (BHIM, PhonePe, Amazon Pay, Google Pay, Paytm, Mobikwick etc. चे पर्यायही उपलब्ध आहेत. कोणताही टॅक्स नाही लागणार तुम्ही दान केलेल्या कोणत्याही रकमेवर टॅक्स लागणार नाही. इनकम टॅक्स कायदा सेक्शन 80G अंतर्गत याकरता टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी क्लेम करता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात