लॉकडाऊनमध्ये बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, मिळणार जास्त पगार

बँकिंग क्षेत्राचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या काळातही काम करणं अनिवार्य आहे. त्यामुळे SBI आणि बँक ऑफ बडोदाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना खूश करणारी घोषणा केली आहे.

बँकिंग क्षेत्राचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या काळातही काम करणं अनिवार्य आहे. त्यामुळे SBI आणि बँक ऑफ बडोदाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना खूश करणारी घोषणा केली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 29 मार्च : देशात पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सर्वजण झटत आहेत. या कठीण काळात अनेकांना सुट्टी देण्यात आली आहे, त काहीजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. मात्र बँकिंग क्षेत्राचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या काळातही काम करणं अनिवार्य आहे. दरम्यान देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आणि सरकारी बँक, बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. (हे वाचा-RBI कडून 3 महिन्याच्या EMI वर सूट, जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर) SBI ने अशी घोषणा केली आहे की, लॉकडाऊन काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांने बँकेकडून अधिक पगार देण्यात येणार आहे. तर बँक ऑफ बडोदाने घोषणा केली आहे की, स्वच्छतेबाबत अधिक काळजी घेण्यासाठी बँकेकडून बँकिंग सहाय्यकांना (Banking Correspondents) 2000 रुपये देण्यात येणार आहेत. SBI देणार अधिक पगार एसबीआय लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिक पगार देणार आहे. 23 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंतचे दिवस यामध्ये कव्हर करण्यात आले आहेत. याअंतर्गत SBI मध्ये काम करणाऱ्या CPSs, CACs, Treasury Operations, Global Markets, GITC आणि IT Services यांचा समावेश आहे. बँक ऑफ बडोदा बँकिंग सहाय्यकांना देणार 2000 रुपये बँक ऑफ बडोदाने सांगितलं की, त्यांचा प्रयत्न असेल की ग्राहक, सामान्य नागरिक आणि बँकेच्या कामात मदत  करणारे बँकिंग सहाय्यक यांचा कोरोनापासून बचाव करू शकेल. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी बँकिंग सहाय्यकांचं केंद्र देखील स्वच्छ असणे गरजेचे आहे. त्यामुळे या बँकिंग करस्पॉन्डंटना 2000 रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या पत्रकामध्ये ही माहिती दिली आहे. (हे वाचा-लॉकडाऊनमध्ये बँकाची काम सुरूच,महत्त्वाचं काम असेल तर जाणून घ्या बदललेल्या वेळा) या पैशांचा वापर कीटाणूनाशन, मास्क इत्यादींच्या खरेदीसाठी करण्यात येईल. त्याचप्रमाणे या कठीण परिस्थितीत सेवा दीर्घकाळ सुरू राहावी याकरता कमीतकमी 5 व्यवहार करणाऱ्या बँकिंग करस्पॉन्डंटना 4 एप्रिलपर्यंत दर दिवसाला 100 रुपये मिळतील.
    First published: