नवी दिल्ली, 17 जुलै: रिझर्व्ह बँकेने (RBI) मास्टर कार्डवर (MasterCard) नवीन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड जारी करण्यावर बंदी (Ban on MasterCard) आणली आहे. आरबीआयच्या (Reserve Bank of India) या निर्णयामुळे अनेक बँकांसाठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे ज्या बँका पूर्णपणे मास्टरकार्डवर अवलंबून आहेत, त्यांना त्यांचे व्यवहार विसा किंवा देशांतर्गत रुपे (RuPay) वर हस्तांतरित करावे लागतील. या संपूर्ण प्रक्रियेकरता साधारण दोन ते तीन महिने जातील. यामुळे त्यांच्या कमाईवर तर प्रभाव होईलच शिवाय पेमेंट सारख्या विविध सेवा देखील प्रभावित होणार आहेत.
का बॅन करण्यात आलं मास्टरकार्ड?
Reserve bank of India ने मास्टरकार्ड वर बॅन या कारणामुळे आणला कारण, मास्टरकार्डकडून लोकल डेटा स्टोरेज संदर्भातील नियमांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे आरबीआयने नवीन कार्ड जारी करण्यावर प्रतिबंध आणले आहेत. मास्टर कार्डला केंद्रीय बँकेने 22 जुलैपासून नवीन ग्राहकांना ऑन-बोर्ड करण्यास निर्बंध आणले आहेत. आरबीआयने एप्रिल 2018 रोजी पेमेंट सेवा देणाऱ्या सर्व कंपन्या, फिनटेकसाठी डेटा स्टोरेज संदर्भात काही नियम जारी केले होते. 2018 च्या या नियमानुसार विदेशी पेमेंट कंपन्यांना पेमेंटचा डेटा लोकल सर्व्हरवर ठेवावा लागेल. मास्टरकार्डवर या नियमांचे पालन न केल्याचा आरोप आहे.
हे वाचा-Paytm आणणार 16600 कोटींचा IPO, कंपनीने SEBI कडे जमा केली कागदपत्र
कोणत्या बँकांचे कार्ड्स होणार प्रभावित?
मास्टरकार्डवर बॅन आल्याने देशातील प्रामुख्याने पाच बँका प्रभावित होणार आहेत. यामध्ये खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँक (Axis Bank), येस बँक (Yes Bank), इंडसइंड बँक (IndusInd Bank) यांचा समावेश आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आणि बजाज फिनसर्व्ह यांचा समावेश आहे. ग्लोबल ब्रोकरेज कंपनी नोमुरा (Nomura)च्या अहवालानुसार आता जवळपास सात अशा आर्थिक संस्था आणि बँका आहेत ज्या नवीन कार्ड्स जारी करू शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे जास्त प्रमाणात मास्टरकार्ड संबंधित सेवा दिली जात असे.
हे वाचा-अॅड्रेस प्रूफशिवाय खरेदी करू शकता LPG गॅस, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
कोणत्या बँकांवर जास्त तर कोणत्या बँकांवर अजिबात परिणाम होणार नाही?
अहवालाच्या मते, सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या बँका आहे- आरबीएल बँक, येस बँक आणि बजाज फिनसर्व्ह. कारण कार्ड जारी करण्यासाठी या संस्था पूर्णपणे मास्टरकार्डवर अवलंबून आहेत. Axis Bank आणि ICICI Bank यांची मास्टरकार्डावरील निर्भरता 35 ते 40 टक्के आहे. एसबीआय आणि एसबीआय कार्ड (SBI Card) त्यांच्या एकूण कार्ड सुविधेचा 10 टक्के हिस्सा मास्टरकार्डसह जारी करते. यामुळे या बँकेवर तसा कमी परिणाम होईल. एचडीएफसी बँकेवर (HDFC Bank) या बॅनचा परिणाम होणार नाही कारण रिझर्व्ह बँक ऑफ इडियाने गेल्यावर्षी एचडीएफसी बँकेवर नवीन डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यावर निर्बंध आणले होते. दरम्यान कोटक महिंद्रा बँकेचा (Kotak Mahindra Bank) संपूर्ण कार्ड पोर्टफोलिओ विसावर निर्भर आहे, त्यामुळे याही बँकेवर कोणताही परिणाम होणार नाही.
हे वाचा-Aadhar Card धारकांनी या चुका करणं टाळा! अन्यथा व्हॉल ऑनलाइन फ्रॉडचे शिकार
सध्याच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम नाही
RBI ने अशी माहिती दिली आहे की या आदेशानंतर मास्टरकार्ड वापरणारे जे सध्याचे ग्राहक आहेत त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मास्टरकार्डला पीएसएस कायद्याअंतर्गत देशामध्ये कार्ड नेटवर्कचं संचालन करण्यासाठी पेमेंट सिस्टम ऑपरेटर म्हणून मंजुरी देण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Axis Bank, Hdfc bank, Icici bank, SBI, State bank of india