मुंबई, 16 जुलै: गेल्या काही वर्षांपासून डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. डिजिटल व्यवहार जेवढे वाढले आहेत तेवढाच त्याबरोबर होणारा धोकाही वाढला आहे. ऑनलाइन फ्रॉडची संख्या गेल्या काही महिन्यात वाढू लागली आहे. अशावेळी एक सतर्क नागरिक म्हणून काही चुका टाळणं आवश्यक आहे. आधार कार्डधारकांनी (
Aadhar Card Holders) काही चुका प्रामुख्याने टाळणं आवश्यक आहे. आधार कार्ड जारी करणारी संस्था
UIDAI ने देखील याबाबत माहिती दिली आहे. आधार कार्डबाबत (
Aadhar Card) काही महत्त्वाच्या खबरदारी न बाळगल्यास तुम्ही फ्रॉडचे शिकार होऊ शकता. तुमचं आधार कार्ड हे बँक खातं, मोबाइल क्रमांक, पॅन, पीएफ खातं, इ. महत्त्वाच्या बाबींशी लिंक असतं. अशावेळी तुमची वैयक्तिक माहिती हॅक झाल्यास मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागेल.
बँक खातं आणि PAN शी तुमचं आधार लिंक असणं अनिवार्य आहे. शिवाय पीएफ खात्याशीही आधार लिंक असणं आवश्यक आहे. जाणून घ्या या महत्त्वाच्या दस्तावेजाविषयी UIDAI ने कोणत्या सूचना दिल्या आहेत.
कधीही शेअर करू नका आधार ओटीपी (Aadhar OTP)- UIDAI ने अशी माहिती दिली आहे आधार कार्डशी संबंधित ओटीपी कुणाशीही शेअर करू नका. यामुळे तुमच्याबरोबर फ्रॉड होण्याची शक्यता आहे.
वैयक्तिक माहिती शेअर करताना सावधान- अनेकदा केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारी व्यक्ती तुम्हाला आधार कार्डावरील तपशील विचारते. ही तुमची वैयक्तिक माहिती असते, ती कुणाशीही शेअर करू नका. बँकेचे अधिकारी किंवा इतर आर्थिक संस्थेशी संबंधित अधिकारी अशाप्रकारे फोन करून कोणतीही माहिती विचारत नाहीत
हे वाचा-नोकरदारांसाठी महत्त्वाचे: Job सोडल्यानंतर PF रक्कम काढण्याची घाई करेल नुकसान
सार्वजनिक कम्प्यूटरमधून डाउनलोड करू नका ई-आधार - UIDAI च्या मते आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी कधीही सार्वजनिक कम्प्यूटरचा वापर करू नका. अर्थात सायबर कॅफे इ. ठिकाणी ई-आधार डाउनलोड करणं टाळा
मोबाइल क्रमांक अपडेट असणं आवश्यक- UIDAI ने अशी सूचना दिली आहे की आधारशी लिंक मोबाइल क्रमांक अपडेट असणं आवश्यक आहे. याविषयी काही समस्या असल्यास तुम्ही https://resident.uidai.gov.in/verify-email-mobile या लिंकवर जाऊन मोबाइल क्रमांक तसंच इमेल व्हेरिफाय करू शकता.
हे वाचा-Post Office मधील या 5 बचत योजना आहेत एकदम खास, गुंतवणूकीवर मिळेल दुप्पट रिटर्न
VID किंवा मास्क्ड आधारचा करा वापर- तुम्ही प्रत्येक ठिकाणी 16 अंक डिस्क्लोज करणारं आधार कार्ड दाखवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही VID (Virtual ID) किंवा मास्क्ड आधारचा वापर करू शकता.
UIDAI तुमची माहिती विचारत नाही- UIDAI ने असं म्हटलं आहे की, त्यांच्याकडून आधार कार्ड धारकाला वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी फोन, एसएमएस किंवा मेल केला जात नाही. ओटीपी विचारण्यासाठी देखील असा फोन किंवा मेसेज केला जात नाही. त्यामुळे तुम्हाला अशी कुणी विचारणा केल्यास सावधान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.