जाहिरात
मराठी बातम्या / मनी / अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय खरेदी करू शकता LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय खरेदी करू शकता LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय खरेदी करू शकता LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

एका नवीन सुविधेअंतर्गत तुम्ही अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय घरगुती गॅस सिलेंडर मिळवू शकता. देशातील सर्वात मोठी तेल मार्केंटिंग कंपनी IOCLने नागरिकांना हा दिलासा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै: घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा नोकरदार वर्गासाठी जेवणाची समस्या कायमची असते. योग्य मेस मिळाली नाही तर अनेकदा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. काहींना जेवण बनवण्यासाठी वेळ असतो पण गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) मिळत नसल्याने त्यांच्याही अडचणी वाढतात. कारण गॅस सिलेंडरसाठी अ‍ॅड्रेस प्रूफ देणं गरजेचं असतं. मात्र एका नवीन सुविधेअंतर्गत तुम्ही अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय घरगुती गॅस सिलेंडर मिळवू शकता. देशातील सर्वात मोठी तेल मार्केंटिंग कंपनी IOCL ने नागरिकांना हा दिलासा दिला आहे. आता लोकांना पाच किलोचा गॅस सिलेंडर कोणत्याही अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय खरेदी करता येईल. यामुळे छोट्या कुटुंबांना किंवा घराबाहेर राहणाऱ्या विद्यार्थी-नोकरदार वर्गाला मदत होईल. याठिकाणाहून खरेदी करा सिलेंडर ग्राहक त्यांच्या शहरात किंवा परिसरातील इंडेन गॅस डिस्ट्रिब्युटर किंवा पॉइंट ऑफ सेलवर जाऊन पाच किलोचा घरगुती गॅस सिलेंडर खरेदी करू शकतात. याकरता तुम्हाला कोणतेही कागदपत्रही देण्याची आवश्यकता नाही. केवळ तुम्हाला या सिलेंडरची किंमत मोजून एलपीजी गॅस सिलेंडर घरी घेऊन यायचा आहे. सध्या या पाच किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 340 रुपये आहे. हे वाचा- Aadhar Card धारकांनी या चुका करणं टाळा! अन्यथा व्हॉल ऑनलाइन फ्रॉडचे शिकार सेलिंग पॉइंटवर करता येईल रिफिल हा पाच किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर तुम्हाला सेलिंग पॉइंटवर रिफिल करता येईल. कशाप्रकारे परत करता येईल हा सिलेंडर? तुम्ही शहर सोडून जात आहात किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी तुम्हाला हा एलपीजी गॅस सिलेंडर परत करायचा आहे तर तसाही पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. इंडेनच्या सेलिंग पॉइंटवर हा सिलेंडर तुम्हाला परत करता येईल. पाच वर्षात परत केल्यानंतर सिलेंडरच्या किंमतीचे 50 टक्के तुम्हाला परत मिळतील आणि पाच वर्षांनतर परत केल्यास 100 रुपये मिळतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LPG Price
  • First Published :
जाहिरात
जाहिरात