मराठी बातम्या /बातम्या /मनी /Paytm आणणार 16600 कोटींचा IPO, कंपनीने SEBI कडे जमा केली कागदपत्र

Paytm आणणार 16600 कोटींचा IPO, कंपनीने SEBI कडे जमा केली कागदपत्र

Paytm IPO: आयपीओसाठी डिजिटल पेमेंट कंपनीने पेटीएमने (Paytm) मार्केट रेग्यूलेटर सेबीकडे (SEBI) या संदर्भातील कागदपत्र जमा केली आहेत.

Paytm IPO: आयपीओसाठी डिजिटल पेमेंट कंपनीने पेटीएमने (Paytm) मार्केट रेग्यूलेटर सेबीकडे (SEBI) या संदर्भातील कागदपत्र जमा केली आहेत.

Paytm IPO: आयपीओसाठी डिजिटल पेमेंट कंपनीने पेटीएमने (Paytm) मार्केट रेग्यूलेटर सेबीकडे (SEBI) या संदर्भातील कागदपत्र जमा केली आहेत.

नवी दिल्ली, 16 जुलै: झोमॅटोच्या आयपीओनंतर (Zomato IPO) आता गुंतवणूकदार उत्सुक आहेत ते पेंमेट कंपनी पेटीएमच्या आयपीओसाठी. या आयपीओनंतर गुंतवणूक क्षेत्रात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या आयपीओसंदर्भात आज महत्त्वाचे अपडेट समोर  आले आहे. पेमेंट कंपनी पेटीएमने (Paytm) शुक्रवारी 16,600 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीकडे (SEBI) अर्ज दाखल केला आहे. या आयपीओमध्ये 8300 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल (OFS) आणि 8300 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू असतील. याशिवाय कंपनी अतिरिक्त 2000 कोटींचे शेअर जारी करू शकते. प्रायव्हेट प्लेसमेंटच्या माध्यमातून 2000 रुपयांच्य इश्यूवर विचार केला जाऊ शकतो.

पेटीएमची पॅरेंट कंपनी One97 Communications आहे. भारतातील आजपर्यंतचा हा सर्वात मोठा आयपीओ आहे. आतापर्यंत हा रेकॉर्ड कोल इंडियाचा होता, कोल इंडियाने दशकापूर्वी आणलेल्या आयपीओमधून 15000 कोटींचा फंड उभा केला होता.

हे वाचा-Gold Price: आज उतरले सोन्याचे दर, सोनं रेकॉर्ड स्तरापेक्षा 7945 रुपयांनी स्वस्त

पेटीएमचे फाउंडर आणि CEO विजय शेखर शर्मा असणार नाहीत कंपनीचे प्रमोटर

पेटीएम ही देशाच्या इंटरनेटवर आधारित असणाऱ्या नव्या पिढीची कंपनी आहे. जी रिटेल आणि संस्थात्मक दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. दरम्यान पेटीएमच्या शेअरहोल्डर्सनी अलीकडेच झालेल्या एजीएममध्ये शेअर्सच्या फ्रेश इश्यूच्या माध्यमातून 12000 कोटींचा फंड उभारण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय शेअरहोल्डर्सनी यासाठीही मंजुरी दिली होती की पेटीएमचे फाउंडर आणि सीईओ विजय शेखर शर्मा कंपनीचे प्रमोटर राहणार नाहीत. त्यांच्याकडे कंपनीची 20 टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी नाही आहे, जी एखाद्या कंपनीचा प्रमोटर होण्यासाठी आवश्यक असते. विजय शेखर शर्मा यांच्याकडे कंपनीची 14.61 टक्के भागीदारी आहे.

हे वाचा-Aadhar Card धारकांनी या चुका करणं टाळा! अन्यथा व्हॉल ऑनलाइन फ्रॉडचे शिकार

शर्मा कंपनीचे चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर राहतील. कंपनीतील हा बदल आधीपासून निश्चित अशा योजनेचा भाग आहे. कोणतीही कंपनी प्रोफेशनली मॅनेज्ड कंपनी होण्यासाठी तिला सेबीची मंजुरी मिळणं आवश्यक असतं. या नियमाअंतर्गत कंपनीमध्ये कोणत्याही व्यक्तीची किंवा कंपनीची 25 टक्क्याहून जास्त भागीदारी असणं आवश्यक आहे.

पेटीएमच्या महत्त्वाच्या गुंतवणूकदारांमध्ये चीनमधील अलीबाब ग्रुप आणि अँट ग्रुप आहे, ज्यांच्याकडे मिळून 38 टक्के भागीदारी आहे. त्यानंतर जपानमधील सॉफ्ट बँकेक़डे 18.73 टक्के भागीदारी आहे.  Elevation Capital कडे 17.65 टक्के भागीदारी आहे.

First published:

Tags: Paytm, Paytm Money, Paytm offers