मराठी बातम्या /बातम्या /मनी /'या' प्लानमध्ये एकदा पैसे गुंतवा अन् आयुष्यभर मिळवा पेंशन, जाणून घ्या सविस्तर

'या' प्लानमध्ये एकदा पैसे गुंतवा अन् आयुष्यभर मिळवा पेंशन, जाणून घ्या सविस्तर

LIC ची ही योजना निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी उत्पन्नाचा स्रोत सुनिश्चित करते. ही योजना वार्षिकी योजना आहे. म्हणजेच ते घेताना तुमची पेन्शनची रक्कम निश्चित केली जाईल. तुम्हाला दरमहा पेंशनची सुविधा मिळेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 जानेवारी: निवृत्तीनंतर तुम्हाला तुमच्या खर्चाची चिंता वाटू लागली असेल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची नवीन जीवन शांती योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आता या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकांना अधिक अ‍ॅन्युटी मिळणार आहे. याचा फायदा ज्या पॉलिसीधारकांनी 5 जानेवारी किंवा त्यानंतर प्लॅन घेतला आहे त्यांना मिळणार आहे. या स्किममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांविषयीच सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

किती इंसेंटिव्ह मिळणार?

LIC ने न्यू जीवन शांती योजनेसाठी उच्च खरेदी किमतीसाठी म्हणजेच हायर पर्चेज प्राइजसाठी इंसेंटिव्ह देखील वाढवले ​​आहे. पॉलिसीधारक आता 3 रुपयांपासून ते 9.75 रुपये प्रति 1000 रुपये खरेदी मूल्यावर इंसेंटिव्ह प्राप्त करु शकतो. इंसेंटिव्ह खरेदी किंमत निवडलेल्या स्थगित कालावधीवर अवलंबून असेल.

Post Office च्या 'या' 5 योजनांमधून करता येईल बंपर कमाई, टॅक्समधूनही मिळेल सूट 

LIC ने एक निवेदन जारी केले आहे की, कंपनीने 05.01.2023 पासून आपल्या वार्षिकी योजनेच्या न्यू जीवन शांती (प्लॅन क्र. 858) संदर्भात अ‍ॅन्युटी रेटमध्ये बदल केला आहे. वाढलेल्या अ‍ॅन्युटी रेटसह योजनेची सुधारित आवृत्ती लागू होईल. 5 जानेवारी 2023 पासून नवीन व्हर्जन उपलब्ध होईल. यामध्ये वाढलेल्या इंसेंटिव्हचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.

LIC ची ही योजना निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी उत्पन्नाचा स्रोत सुनिश्चित करते. ही योजना वार्षिकी योजना आहे. म्हणजेच ते घेताना तुमची पेन्शनची रक्कम निश्चित केली जाईल. तुम्हाला दरमहा पेंशनची सुविधा मिळेल.

LIC च्या ‘या’ योजनेत दररोज गुंतवा 200 रुपये, मिळतील 28 लाख रुपये 

योजनेसाठी दोन पर्याय आहेत

नवीन जीवन शांती योजना ही सिंगल प्रीमियम योजना आहे. या योजनेत तुम्हाला 2 प्रकारचे पर्याय मिळतात. पॉलिसीधारक सिंगल लाइफ आणि जॉइंट लाइफ डिफर्ड अ‍ॅन्युटी यापैकी एक निवडू शकतात. पहिल्या पर्यायामध्ये, तुम्ही एका व्यक्तीसाठी पेंशन योजना खरेदी करू शकता. डेफर्ड अ‍ॅन्युटी फॉर सिंगल लाइफमध्ये ज्या वेळी पॉलिसीधारकाचा मृत्यू होतो. तेव्हा नॉमिनी व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा केले जातील. डेफर्ड अ‍ॅन्युटी फॉर जॉइंट लाइफमध्ये ज्यावेळी एका व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा दुसऱ्याला पेंशनची सुविधा मिळते.

किमान खरेदी किंमत काय आहे

LIC च्या न्यू जीवन शांती योजनेसाठी किमान खरेदी किंमत 1.5 लाख रुपये आहे. हे तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये किमान अ‍ॅन्युटी देईल. तसेच कमाल खरेदी किंमतीवर मर्यादा नाही. सिंगल लाइफसाठी डिफर्ड अ‍ॅन्युटीमध्ये तुम्हाला 10 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी करून 11,192 रुपये मासिक पेंशन मिळू शकते. जॉइंट लाइफसाठी डिफर्ड अ‍ॅन्युटीमध्ये मासिक पेंशन 10,576 रुपये असू शकते. अ‍ॅन्युटीची रक्कम प्रत्येक केसमध्ये बदलू शकते. याबाबत अधिक माहिती एलआयसीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

First published:

Tags: LIC, Pension scheme