टॅक्स बचत करण्यासाठी तुम्हाला देखील गुंतवणूक करायची असेल आणि कोणतीही जोखिम नको असेल तर पोस्ट ऑफिसच्या काही स्किम तुमच्यासाठी बेस्ट ठरु शकतील. या योजनांमध्ये, 80C अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये सूट दिली जाते.
सीनियर सिटीझन सेविंग स्किम (SCSS): ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत 55 ते 60 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. यामध्ये, एकाच वेळी 15 लाख रुपये जमा करून, पाच वर्षांच्या मुदतीनंतर, तुम्ही 8% व्याजाने नफा मिळवू शकता. या अंतर्गत 1.5 लाख रुपयांची टॅक्स सेविंग देखील करता येईल.
पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF): पब्लिक प्रोव्हिडेंट फंड अंतर्गत, तुम्हाला 7.1 टक्के वार्षिक व्याज दिले जाते. ही एक टॅक्स फ्री स्किम आहे, कारण या योजनेत इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जाते. दुसरीकडे, वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक तुम्ही करु शकता.
सुकन्या समृद्धी योजना (SSY): सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी खाते उघडले जाऊ शकते. यापेक्षा जास्त वयाच्या मुलींसाठी खाते उघडले जाऊ शकत नाही. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलगी या खात्यातून काही रक्कम काढू शकते. सध्या या योजनेत 7.6 टक्के व्याज आहे आणि कलम 80C अंतर्गत 1.5 रुपयांची सूट दिली जाते.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट: पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट अंतर्गत, वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याज देखील दिले जाते. ज्या अंतर्गत कमाल व्याज 7 टक्के आहे. तुम्ही यामध्ये किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या अंतर्गत तुम्ही 5 वर्षांच्या कालावधीवर 1.5 लाख रुपयांची टॅक्स सेविंग करु शकता.
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट: या अंतर्गत तुम्ही 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकता आणि या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला 7 टक्के व्याज देते. यामध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सूट दिली जाते.