जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC च्या ‘या’ योजनेत दररोज गुंतवा 200 रुपये, मिळतील 28 लाख रुपये

LIC च्या ‘या’ योजनेत दररोज गुंतवा 200 रुपये, मिळतील 28 लाख रुपये

LIC च्या ‘या’ योजनेत दररोज गुंतवा 200 रुपये, मिळतील 28 लाख रुपये

LIC च्या ‘या’ योजनेत दररोज गुंतवा 200 रुपये, मिळतील 28 लाख रुपये

LIC Jeevan Pragati Plan : LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेंतर्गत किमान मुदत 12 आणि 20 वर्षे आहे. 12 ते 45 वर्षे वयोगटातील लोक ही विमा योजना खरेदी करू शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 डिसेंबर: अलीकडच्या काळात लोकांना गुंतवणूकीचं महत्त्व पटलेलं आहे. लोक आपापल्या क्षमतेनुसार पैसे वाचवून ते विविध ठिकाणी गुंतवतात.  जर तुम्हालाही गुंतवणुकीत स्वारस्य असेल तर LIC च्या विमा योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. कारण लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विमा योजना देते. यामध्ये सुरक्षेसोबतच गुंतवणुकीचा पर्यायही उपलब्ध आहे आणि मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर चांगली रक्कम दिली जाते. भारतीय आयुर्विमा महामंडळाची जीवन प्रगती विमा योजना (LIC Jeevan Pragati Bima Yojana) तुम्हाला काही वर्षांत करोडपती बनवू शकते. यामध्ये दररोज 200 रुपये जमा करून, तुम्ही मॅच्युरिटीवर 28 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. जर तुम्ही एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जीवन प्रगती योजना खरेदी करू शकता. एलआयसीच्या जीवन प्रगती विमा योजनेत गुंतवणूक करून लोकांना आजीवन संरक्षण दिलं जातं. तसेच, दररोज 200 रुपये गुंतवल्यास या योजनेअंतर्गत एका महिन्यात 6,000 रुपये जमा होतील. म्हणजे वर्षाला 72 हजार रुपये जमा होतील. त्यानंतर 20 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला या योजनेत बोनससह 28 लाख रुपये मिळतील. या विमा योजनेत दर पाच वर्षांनी रिस्क कव्हर वाढतच जाते. याचा अर्थ दर पाच वर्षांनी विम्याची रक्कम वाढेल. डेथ बेनिफिटबद्दल बोलायचं झालं तर पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर, बोनस आणि विमा रक्कम त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला दिली जाते.  हेही वाचा:  Fixed Deposit: 700 दिवसांच्या एफडीवर ‘ही’ बँक देतीये तगडा व्याजदर, वाचा संपूर्ण माहिती योजनेचे नियम -

  • LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेअंतर्गत किमान मुदत 12 ​​आणि 20 वर्षे आहे.
  • 12 ते 45 वर्षे वयोगटातील लोक ही विमा योजना खरेदी करू शकतात.
  • या योजनेअंतर्गत, प्रीमियमची रक्कम तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर जमा केली जाऊ शकते.
  • किमान विमा रक्कम 1.5 लाख आहे आणि कमाल मर्यादा नाही.

अशा प्रकारे तुम्हाला मिळेल विमा संरक्षण- जर कोणी या योजनेत 4 लाख रुपयांची विमा पॉलिसी घेतली असेल तर पाच वर्षांनी ती 5 लाख रुपये होईल. त्यानंतर 10 ते 15 वर्षांसाठी 6 लाख रुपये आणि 20 वर्षांत ही रक्कम 7 लाख रुपये होईल. यापेक्षा चांगली संधी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल तितका चांगला परतावा मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात