मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमच्या LIC Policy ची सद्यस्थिती काय? घरबसल्या एका क्लिकवर पाहा

तुमच्या LIC Policy ची सद्यस्थिती काय? घरबसल्या एका क्लिकवर पाहा

LIC

LIC

आता ग्राहक त्यांच्या LIC पॉलिसीची सगळी माहिती ऑनलाइन घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना ऑफिस मध्ये जायची गरज नाही.

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: घरातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू आला तर त्याच्यामागे त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक तरतूद करण्याचा एक सुरक्षित पर्याय म्हणून एलआयसी पॉलिसी (LIC Policy) घेतली जाते. आज देशात अनेक विमा कंपन्या आल्या असल्या तरी एलआयसी म्हणजे लाईफ इन्श्युरन्स कार्पोरेशन अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वांत मोठी आयुर्विमा कंपनी असून, तिची विश्वसार्हता गेल्या 65 वर्षापासून अबाधित आहे. बदलत्या काळानुरूप एलआयसीनंही आपला चेहरामोहरा बदलला असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ग्राहकांना सर्व आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे एलआयसीच्या ग्राहकालाही आता घरबसल्या सर्व माहिती मिळू शकते. पॉलिसीचा हप्ताही घरबसल्या भरता येतो. तसंच रजिस्ट्रेशन केलेलं असल्यास पुढचा हप्ता कधी भरायचा आहे, याची पूर्वसूचनाही आता मोबाइलवर एसएमएसद्वारे दिली जाते. घरबसल्या काम होत असल्यानं ग्राहकांचा वेळ आणि ऊर्जाही वाचते.

तुम्ही एलआयसीची पॉलिसी (Life Insurance Policy) खरेदी केली असेल आणि त्याची सद्यस्थिती काय, ती कधी संपणार, हप्ता किती याबद्दल माहिती हवी असेल तर आता त्यासाठी एलआयसीच्या ऑफिसात जायची गरज नाही. आता ही सर्व माहिती तुम्हाला ऑनलाइन (Online) तसंच एसएमएसद्वारेही (SMS) मिळू शकते.

ऑनलाईन माहिती

एलआयसी पॉलिसीची ऑनलाइन माहिती (Online Information) मिळवण्यासाठी सर्वात आधी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर https://www.licindia.in  रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.

हे वाचा -  Insurance Policy काढताय; मग या 5 गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात

याकरता तुमचं नाव, जन्मतारीख, पॉलिसी क्रमांक नोंदवावा लागेल. एकदा तुमचं नाव रजिस्टर झालं की तुम्ही केव्हाही तुमच्या पॉलिसीची अद्ययावत माहिती घेऊ शकता.

एसएमएसद्वारे माहिती

एलआयसी पॉलिसीची एसएमएसद्वारे (SMS) माहिती मिळवण्यासाठी 56677 या क्रमांकावर तुमच्या मोबाइलवरून एसएमएस पाठवावा लागेल. पॉलिसीचा हप्ता (Policy Premium) किती आहे हे जाणून घेण्यासाठी  ASKLIC PREMIUM  असा मेसेज 56677 क्रमांकावर पाठवावा. पॉलिसी लॅप्स (Policy Laps) झाली असेल तर ASKLIC REVIVAL असा मेसेज 56677 क्रमांकावर पाठवावा लागेल.

कॉलवर माहिती

तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर तुम्ही 022-68276827 या क्रमांकावर फोन करू शकता किंवा 9222492224 या क्रमांकावर LICHELP आणि पॉलिसी नंबर पाठवून माहिती मिळवू शकता. मेसेज पाठवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

First published:

Tags: Insurance, LIC, Money, Policy, SMS