मराठी बातम्या /बातम्या /मनी /Insurance Policy काढताय? मग या 5 गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात

Insurance Policy काढताय? मग या 5 गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात

LIC

LIC

Life Insurance Policy चा प्रीमियम ठरवण्यासाठी संबंधित व्यक्तीचं आरोग्य (Health) आणि जीवनशैली (Life Style) या दोन घटकांचा प्राधान्याने विचार केला जात असल्याचे तज्ज्ञ म्हणतात.

नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी :  विमा पॉलिसी (Life Insurance Policy) घेताना प्रत्येकाच्या मनात हाच विचार असतो की पॉलिसीच्या प्रीमियमवर (Policy Primium) महिन्याला किती खर्च करावा लागेल. असा विचार करणं स्वाभाविकच आहे. पॉलिसी कव्हरेजमधील कराराच्या किंमतीवर नसावी. पॉलिसी कव्हरमध्ये कराराचा अर्थ असा होतो की जीवन विमा खरेदी करण्याचा हेतू पूर्ण होणार नाही. अशा परिस्थितीत पॉलिसी कव्हरचे फायदे कमी न करता प्रीमियमचा बोजा कमी करण्यासाठी विमा कंपन्या प्रीमियम कोणत्या आधारवर ठरवतात, हे समजून घेणं गरजेचं आहे.

आर्थिक जोखीम व्यवस्थापनासाठी लाईफ इन्शुरन्स (Life Insurance) हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर ही जोखीम अवलंबून असते. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या तरुण व्यक्तीचा मृत्यू दर कमी असेल तर त्यांना सामान्यतः वृद्ध व्यक्तीच्या तुलनेत समान कव्हरसाठी कमी पैसे द्यावे लागतील. त्याचप्रमाणे जर एकाच वयाचे दोन लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या आरोग्याची स्थिती आणि मिळकत क्षमता देखील भिन्न असतील तर त्यांना समान पॉलिसीसाठी वेगवेगळ्या दराने पैसे द्यावे लागतील.

हे वाचा - विमा कंपनीला घडवली अद्दल; 2.53 कोटींसाठी 21 वर्षे लढत होता एक मुंबईकर, अखेर...

पॉलिसीचा प्रीमियम ठरवण्यासाठी संबंधित व्यक्तीचं आरोग्य (Health) आणि जीवनशैली (Life Style) या दोन घटकांचा प्राधान्याने विचार केला जात असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. याशिवाय विमा हा अनेक घटकांवर देखील अवलंबून असतो. पॉलिसी कव्हरमध्ये आपण गुंतवलेली रक्कम आपल्याला परत मिळवायची असेल तरी देखील बचतीच्या तुलनेत प्रीमियमवर जास्त रक्कम द्यावी लागते. अशा प्रकारे कोणत्याही विमा पॉलिसीचे प्रीमियम वय, लिंग, आरोग्याची स्थिती, प्रीमियम भरण्याची अट, पॉलिसीचा कालावधी आदी घटक लक्षात घेऊन ठरवलेले असतात. जर तुम्हाला प्रीमियममध्ये चांगलं कव्हरेज हवे असेल तर खालील गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा.

कमी वयातच विमा पॉलिसी खरेदी करावी

28 ते 30 वयादरम्यान जर तुम्ही पॉलिसी खरेदी केली तर त्याचे अनेक फायदे आहेत. कमी वयात पॉलिसी खरेदी करणं म्हणजे पॉकेट फ्रेंडली होणं होय. वाढत्या वयानुसार जबाबदाऱ्यांमध्ये देखील वाढ होते, त्यामुळे या कालावधीत पॉलिसी खरेदी करणं तुम्हाला महागात पडू शकतं. सोप्या शब्दात सांगायचं तर कमी वयात पॉलिसी खरेदी केल्यास प्रीमियममध्येच जीवन विम्याचे अधिक फायदे मिळतात.

मुदत विमा (टर्म पॉलिसी) खरेदी करा

कोणत्याही व्यक्तीच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये (Investment Portfolio) टर्म पॉलिसी एक आवश्यक आर्थिक साधन म्हणून कार्य करते. जर तुमचा दुर्देवाने मृत्यू झाला तर अशा अडचणीच्या काळात ही पॉलिसी उपयुक्तच ठरते. टर्म पॉलिसीत मोठे कव्हर आणि प्रीमियमची रक्कम कमी असते. पण विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरच कव्हर मिळतं. गंभीर आजार, अपघात आणि अपघाती मृत्यू यांचा देखील समावेश या पॉलिसीला अधिक सक्षम करण्यासाठी करू शकता. पण त्यासाठी पॉलिसी प्लॅन दीर्घकालीन असणं आवश्यक आहे. एका 35 वर्षीय वयाच्या व्यक्तीला आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत 10 ते 15 टक्के जास्त रकमेचे विमा कव्हर घेणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मात्र या पॉलिसीत मॅच्युरिटीच्या वेळी कोणतीही रक्कम मिळत नाही.

योग्य पॉलिसी निवडा

योग्य पॉलिसीची निवड म्हणजेच प्रीमियम खर्चात बचत. जीवन विमा पॉलिसीचा अवधी कमी असता कामा नये, तसंच हा अवधी अगदी दीर्घकालीन नसावा. योग्य कालावधी निवडण्यासाठी एकूण देणं संपल्यानंतर कोणत्या वर्षात तुमची एकूण गुंतवणूक जीवन विमा योजनेपेक्षा जास्त असेल, हे तपासणं गरजेचं आहे. समजा सध्या एखादी टर्म पॉलिसी 40 वर्षांपर्यंत कव्हरेज देते. पण व्यावहारिकदृष्ट्या एखाद्या व्यक्तीचं दीर्घकालीन कालावधीत देणं कधी संपेल हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे अशा वेळी 40 वर्षांपर्यंत कव्हरेज देणाऱ्या पॉलिसीपेक्षा निवृत्तीच्या वयापर्यंतची एखादी पॉलिसी घेणं अधिक फायदेशीर ठरेल. जर एखादी व्यक्ती 40 वर्षी एखादी पॉलिसी घेत असेल, तर त्याने तिचा कालावधी वयाच्या 60 ते 65 वर्षांपर्यंतच राहिल असे पाहावे.

हे वाचा - मोठी बातमी! सलग 5 तासांहून अधिक वेळ काम करता? 1 एप्रिलपासून मोदी सरकार नियमांमध्ये करणार बदल

लाईफ इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी प्लॅन्सची तुलना करा

प्रीमियम, खात्रीशीर रक्कम आदी गोष्टी विचारात घेऊन इन्शुरन्स प्लॅन्सची (Plans) तुलना करावी. तसंच विविध कंपन्यांच्या क्लेम सेटलमेंट रेशिओचीदेखील तुलना करावी, कारण टर्म पॉलिसी खरेदी करते वेळी यांची भूमिका महत्त्वाची असते. तसंच यामुळे कोणत्याही एका आर्थिक वर्षात कोणती इन्शुरन्स कंपनी किती टक्के सेटलमेंट करू इच्छिते, याबाबत माहिती मिळते. समजा एखादी कंपनी म्हणते की त्यांचा सेटलमेंट रेशिओ 91 टक्के आहे, म्हणजेच त्या कंपनीने एका आर्थिक वर्षात 100 क्लेम्सपैकी 91 क्लेम्सची रक्कम दिली आहे. अन्य 9 क्लेम रिजेक्ट झाले आहेत.

अनावश्यक रायडर्स खरेदी करु नका

जेव्हा लाईफ इन्शुरन्स खरेदीबाबत निर्णय घेतला जातो, अशा वेळी बाजारात अनेक फायदेशीर रायडर्स (Riders) उपलब्ध असतात. त्यांच्या किफायतशीर दरांमुळे ग्राहक त्याकडे आकर्षित होतात. टर्म इन्शुरन्स रायडर्स एकप्रकारे टर्म इन्शुरन्स पॉलिसीला जोडलेलाच असतो. यामुळे विमाधारकाला अतिरिक्त कव्हरेज मिळतं. या रायडर्सचा खर्च टर्म प्लॅननुसार वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे रायडर्स खरेदी करण्यापूर्वी त्याबाबत योग्य आणि सखोल माहिती घेणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Business News, Insurance, Investment, Money, Policy plans