नवी दिल्ली, 07 जुलै: तुम्ही देखील 7 ते 14 दिवसांत चांगला नफा कमावू इच्छित असाल तर देशातील सरकारी तसंच खाजगी बँका तुम्हाला ही संधी देत आहेत. तुम्ही बँक एफडी (
Bank Fixed Deposit) मध्ये पैसे गुंतवणूक 7-14 दिवसांत चांगला नफा मिळवू शकता. या बँकामध्ये या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर मिळत आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियापासून PNB, ICICI आणि HDFC या बँकांमध्ये तुम्ही अत्यंत कमी कालावधीसाठी देखील एफडी करू शकता. याठिकाणी जाणून घ्या तुम्ही 7 दिवसात कोणत्या बँकेतून तुम्हाल किती व्याज मिळेल.
1. स्टेट बँक ऑफ इंडिया- देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया 7 दिवसांच्या एफडीसाठी 2.90 टक्के दराने व्याजदर देत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी SBI 3.40 दराने व्याज देत आहे.
2. बँक ऑफ बडोदा- BoB मध्ये 7 दिवसांच्या एफडीवर 2.80 टक्के दराने व्याजदर मिळतो आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.30 टक्के आहे
3. आयसीआयसीआय बँक- ICICI Bank त्यांच्या ग्राहकांना 7 ते 14 दिवसांच्या एफडीसाठी 2.50 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 2.50 दराने एफडीवर व्याज देत आहे.
4. एचडीएफसी बँक- HDFC Bank त्यांच्या ग्राहकांना 7 ते 14 दिवसांच्या एफडीसाठी 2.50 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 3.00 दराने एफडीवर व्याज देत आहे.
हे वाचा-Post Office ची बंपर ऑफर! केवळ 5 वर्षात बनेल 14 लाखांचा फंड, वाचा सविस्तर
5. बँक ऑफ इंडिया- BOI मध्ये 7 दिवसांच्या एफडीवर 03.00 टक्के दराने व्याजदर मिळतो आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.50 टक्के आहे
6. पीएनबी आणि पंजाब अँड सिंध बँक- PNB आणि पंजाब अँड सिंध बँकेमध्ये सामान्य नागरिकांसाठी 3 टक्के दराने एफडीवर व्याज मिळते आहे. या दोन्ही बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के दराने FD वर व्याज मिळते आहे.
7. यूनियन बँक ऑफ इंडिया- या बँकेत 7 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3 टक्के दराने व्याज मिळते आहे.
8. बंधन बँक- बंधन बँकेत 7 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3 टक्के दराने व्याज मिळते आहे. तर याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के दराने व्याज मिळते आहे.
9. येस बँक- YES बँकेत 7 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3.25 टक्के दराने व्याज मिळते आहे. तर याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के दराने व्याज मिळते आहे.
हे वाचा-ही सरकारी कंपनी देत आहे 2 कोटी जिंकण्याची संधी, या क्रमांकावर पाठवावा लागेल SMS
10. डीसीबी बँक- डीसीबी बँकेत सात दिवसांच्या एफडीवर 4.55 टक्के दराने व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी याठिकाणी 5.05 टक्के दराने व्याज मिळते आहे.
11. इंडियन ओव्हरसीज बँक- याशिवाय इंडियन ओव्हरसीज बँकेत सात दिवसांच्या एफडीवर 3.40 दराने व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी याठिकाणी 3.90 टक्के दराने व्याज मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.