Home /News /money /

Post Office ची बंपर ऑफर! केवळ 5 वर्षात बनेल 14 लाखांचा फंड, वाचा सविस्तर

Post Office ची बंपर ऑफर! केवळ 5 वर्षात बनेल 14 लाखांचा फंड, वाचा सविस्तर

पोस्ट ऑफिस (Post Office) सीनिअर सिटीझन स्कीमच्या माध्यमातून 14 लाखांचा फंड सहज उभा करू शकता. पोस्टाची ही योजना गुंतवणूकदारांना 7.4 टक्के व्याजदर देते.

    नवी दिल्ली, 06 जुलै: पोस्ट ऑफिस (Post Office) मार्फत ग्राहकांच्या फायद्यासाठी विविध योजना राबवण्यात येतात. विविध वयोगटातील लोकांसाठी पोस्टाकडून योजना आखण्यात आल्या आहेत, तरुणांपासून वयोवृद्धांसाठी यामध्ये योजना आहेत. आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये पाच वर्षात तुम्ही 14 लाखांचा फंड उभा करू शकता. जाणून घ्या सविस्तर... पोस्ट ऑफिस (Post Office) सीनिअर सिटीझन स्कीमच्या माध्यमातून 14 लाखांचा फंड सहज उभा करू शकता. पोस्टाची सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम (Post Office Senior Citizen Savings Scheme)  ही योजना गुंतवणूकदारांना 7.4 टक्के व्याजदर देते. कोण उघडू शकतं खातं? -सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये खातं उघडणाऱ्या ग्राहकाचं वय कमीत कमी 60 वर्ष असणं आवश्यक आहे. -60 किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तीच या योजनेमध्ये खातं उघडू शकतात -याशिवाय स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात -सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीमचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे, मात्र यामध्ये तुम्ही वाढ देखील करू शकता. -या स्कीमअंतर्गत तुम्ही कमीतकमी 1000 रुपये गुंतवून खातं सुरू करू शकता. इंडिया पोस्टच्या वेबसाइट नुसार, मॅच्युरिटीनंतर तुम्ही ही योजना तीन वर्षांसाठी वाढवू शकता. मॅच्युरिटीनंतर हा कालावधी वाढवण्यासाठी खातेधारकाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. हे वाचा-ही सरकारी कंपनी देत आहे 2 कोटी जिंकण्याची संधी, या क्रमांकावर पाठवावा लागेल SMS कसे मिळतील 14 लाख? जर सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही एकरकमी 10 लाखांची गुंतवणूक केली तर वार्षिक 7.4 टक्के (कंपाउंडिं) व्याजदराच्या हिशोबाने पाच वर्षानंतर गुंतवणुकदारांना मिळणारी रक्कम 14,28,964 रुपये असेल. याठिकाणी तुम्हाला  4,28,964 रुपये व्याज मिळेल. मिळेल टॅक्स सवलतीचा फायदा या योजनेमध्ये दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर टीडीएस कापला जाईल. मात्र SCSS मध्ये गुंतवणूक केल्यास इन्कम टॅक्स कायदा 1961 सेक्शन 80 सी अंतर्गत सूट देखील मिळते. हे वाचा-मोठी बातमी! DA बाबत या आठवड्यात मोदी सरकार घेणार अंतिम निर्णय काढता येईल जॉइंट खातं SCSS अंतर्गत डिपॉझिटर एकल किंवा संयुक्त खातं काढू शकतात. पती किंवा पत्नीसह त्यांना हे जॉइंट खातं काढता येईल. मात्र दोघांचीही मिळून जास्तीत जास्त गुंतवणूक 15 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये. खातं उघडताना किंवा बंद करताना नॉमिनेशन फॅसिलिटी उपलब्ध आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Post office, Post office balance, Post office customers

    पुढील बातम्या