आज धावणार या आठ स्पेशल ट्रेन, जाणून घ्या काय आहेत वेळा आणि कोणत्या स्टेशनवर थांबणार

आज धावणार या आठ स्पेशल ट्रेन, जाणून घ्या काय आहेत वेळा आणि कोणत्या स्टेशनवर थांबणार

जर तुम्ही देखील ट्रेनने प्रवास करणार आहात, तर जाणून घ्या कोणकोणत्या ट्रेन आज धावणार आहेत. तसच या गाड्यांच्या वेळा काय आहेत आणि त्या कोणत्या स्थानकांमध्ये थांबतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus)चे संक्रमण रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये ट्रेन्स बंद होत्या. आजपासून भारतीय रेल्वे (Indian Railway) काही विशेष ट्रेन चालवणार आहे. आज नवी दिल्लीपासून देशातील काही महत्त्वाच्या शहरांदरम्यान 8 स्पेशल ट्रेन धावणार आहेत. या ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंग सोमवारी करण्यात आली आहे. पहिली ट्रेन नवी दिल्लीपासून विलासपूर या मार्गावर धावणार आहे. जर तुम्ही देखील ट्रेनने प्रवास करणार आहात, तर जाणून घ्या कोणकोणत्या ट्रेन आज धावणार आहेत. तसच या गाड्यांच्या वेळा काय आहेत आणि त्या कोणत्या स्थानकांमध्ये थांबतील.

या मार्गांवर धावणार ट्रेन्स

या विशेष ट्रेन नवी दिल्ली-विलासपूर, हावडा-नवी दिल्ली, राजेंद्र नगर-नवी दिल्ली, नवी दिल्ली-डिब्रूगड, नवी दिल्ली-बंगळुरू, बेंगळुरू-नवी दिल्ली, मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-नवी दिल्ली या मार्गांवर धावणार आहेत.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये फायद्याची ठरेल मोदी सरकारची ही योजना, मिळेल 3.75 लाखांची मदत)

जर तुम्ही या मार्गांवरून धावणाऱ्या ट्रेनने प्रवास करणार आहात तर त्यांच्या वेळा आणि त्या कोणत्या स्थानकांत थांबणार आहेत, हे पाहणं आवश्यक आहे.

काय आहेत वेळा आणि कोणत्या स्थानकांत थांबणार?

-हावडा (16:50)-नवी दिल्ली (10:00) : धनबाद जंक्शन, गया जंक्शन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल.

-राजेंद्र नगर (19:00)-नवी दिल्ली (07:40): पटना जंक्शन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल.

-नवी दिल्ली(16:10)-डिब्रूगड (07:00) : दीमापूर, गुवाहाटी, न्यू बोंगाइगांव, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरौनी जंक्शन, दानापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपुर सेंट्रल.

(हे वाचा-पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, पोस्ट ऑफिसमध्ये देखील होईल काम)

-बेंगळुरू (20:00)-नवी दिल्ली (05:55): अनंतपूर, गुंटाकल जंक्शन, सिकंदराबाद जंक्शन, नागपूर, भोपाळ जंक्शन, झाशी जंक्शन

-नवी दिल्ली (15:45)-विलासपूर (12:00): झाशी, भोपाळ, नागपूर, रायपूर जंक्शन

-मुंबई सेंट्रल (17:00)-नवी दिल्ली (08:35): बडोदा, रतलाम, कोटा

-अहमदाबाद (17:40)-नवी दिल्ली (07:30) : पालनपूर, अबु रोड, जयपूर, गुडगांव.

-नवी दिल्ली-बंगळुरू : अनंतपूर, गुंटकल जंक्शन, सिकंद्राबाद जंक्शन, नागपूर, भोपाल जंक्शन, झाशी जंक्शन.

(हे वाचा-बँक खात्यात तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? SBIने 44 कोटी ग्राहकांना केलं सावधान)

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी या रेल्वेतून प्रवास करताना काही नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे. याकरता प्रवाशांना दोन तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचणे आवश्यक आहे. तसच ज्या प्रवाशांकडे कन्फर्म्ड आणि वैध तिकीट असेल त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक राहील. मास्कसाठी तुम्ही गमछा किंवा स्कार्फचा देखील वापर करू शकता. रेल्वे सुरू होण्याआधी रेल्वे प्रवाशांना स्क्रिनिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रवासादरम्यान सोशल डिस्टिंसिंगच्या नियमांचे पालन काटेरोरपणे करणं आवश्यक आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण नाही आहेत, त्यांनाच रेल्वेमध्ये चढण्यास परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्व प्रवाशांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे गरजेचे आहे, अन्यथा ट्रेनमध्ये चढता येणार नाही. ट्रेनमध्ये तुम्हाला रेल्वे विभागाकडून चादर किंवा पांघरूण मिळणार नाही. कोरोनाच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता शासनाने ही योजना बंद केली आहे.

First published: May 12, 2020, 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading