बँक खात्यात तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? SBI ने त्यांच्या 44 कोटी ग्राहकांना केलं सावधान

बँक खात्यात तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? SBI ने त्यांच्या 44 कोटी ग्राहकांना केलं सावधान

SBI ने त्यांच्या ट्वीटमध्ये एटीएम फ्रॉडपासून वाचण्याासाठी काही सेफ्टी मंत्र सांगितले आहेत. बँकेने दिलेल्या सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : सध्या लॉकडाऊनचा फायदा अनेक भामट्यांकडून घेतला जात आहे. एटीएम फ्रॉडच्या घटना देखील वाढल्या आहे. त्यामुळे अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने (State Bank of India SBI) त्यांच्या 44 कोटी ग्राहकांना सुरक्षेसाठी काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स दिल्या आहेत. त्यांचा वापर करत तुम्ही तुमच्या खात्यातील पैसे सुरक्षित ठेवू शकता. ट्विटरवरून एसबीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. या सेफ्टी मंत्रांचा वापर करत तुम्ही फसवणूक होण्यापासून स्वत:ला वाचवू शकता. देशामध्ये कोरोनाच्या संकटकाळात ऑनलाइन फ्रॉडचे संकटही डोकं वर काढू लागले आहे. अशावेळी आपला पैसा आपणच सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. SBI त्यांच्या ग्राहकांना नेहमीच सावधान करत असते. यावेळीही एसबीआयने काही सेफ्टी मंत्र दिले आहेत.

जाणू घ्या काय आहेत हे 'सेफ्टी मंत्र'

-ATM/POS मशीनमध्ये पिन टाकताना किपॅड झाकून घ्या

(हे वाचा-आजपासून मोदी सरकारकडून खरेदी करा स्वस्त सोनं, वाचा कशी कराल गुंतवणूक)

-एटीएम पिन लक्षात ठेवा, एटीएम कार्ड किंवा कुठेही तो पिन लिहून ठेवू नका

-कोणाचा वाढदिवस किंवा अशा सहज लक्षात येणाऱ्या तारखांवरून तुमचा पिन ठेवू नका

-एसएमएस नोटिफिकेशनचा पर्याय निवडा आणि वापर झाल्यानंतर एटीएमएममधून आलेली पावती फाडून टाका

-एटीएमचा वापर करण्याआधी तपासून पाहा की त्याठिकामी भामट्यांनी कोणता छुपा कॅमेरा लावला नाही आहे ना

(हे वाचा-मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यास चीनला 5 वर्ष द्यावी लागेल मोठी भरपाई)

-एसबीआय मिस्ड कॉलचा पर्याय निवडा आणि आवश्यतेनुसार तुमच्या व्यवहारांची माहिती घ्या

-कोणालाही तुमचा ओटीपी, डेबिट कार्ड पिन किंवा अन्य कोणतीही माहिती देऊ नका

-एटीएम पिन, ओटीपी किंवा अन्य गोपनीय माहिती विचारणाऱ्या कोणत्याही मेल किंवा मेसेजला रिप्लाय देऊ नका

-एका वेळी एटीएम रुममध्ये एकापेक्षा अनेक व्यक्तींना परवानगी नसते

-तुमच्या मागे कुणी असल्यास पिन वाचला जाण्यापासून सावधान राहा

संपादन - जान्हवी भाटकर

 

 

First published: May 11, 2020, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading