मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, पोस्ट ऑफिसमध्ये देखील होईल काम

पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, पोस्ट ऑफिसमध्ये देखील होईल काम

बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम किंवा बँकेत जाऊन विड्रॉल फॉर्म भरणे हे पर्याय उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिसने देखील बँक खातेधारकांना पैसे काढण्याची सुविधा दिली आहे

बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम किंवा बँकेत जाऊन विड्रॉल फॉर्म भरणे हे पर्याय उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिसने देखील बँक खातेधारकांना पैसे काढण्याची सुविधा दिली आहे

बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम किंवा बँकेत जाऊन विड्रॉल फॉर्म भरणे हे पर्याय उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिसने देखील बँक खातेधारकांना पैसे काढण्याची सुविधा दिली आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 12 मे : बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम किंवा बँकेत जाऊन विड्रॉल फॉर्म भरणे हे पर्याय उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिस (Post Office) ने देखील बँक खातेधारकांना पैसे काढण्याची सुविधा दिली आहे. Aadhaar Enabled Payment System (AePS) च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँक खात्यातील पैसे पोस्ट ऑफिसमधून काढू शकता. याकरता खातेधारकांचे खाते आधार कार्डबरोबर लिंक असणे आवश्यक आहे. जाणून घ्या AePS या सुविधेचा लाभ कसा घ्याल.

काय आहे AePS?

आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिम (AePS) ही सुविधा नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ने विकसीत केलेली एक सुविधा आहे. या अंतर्गत लोकांना आधार नंबर आणि त्यांच्या हाताच्या बोटांच्या ठशांच्या मदतीने व्हेरिफिकेशन करून मायक्रो एटीएमद्वारे आर्थिक टान्झाक्शन करण्यास परवानगी देते.

(हे वाचा-मोदी सरकारची ही योजना तरुणांंसाठी फायदेशीर, मिळणार 3.75 लाखांची मदत)

या पेमेंट सिस्टिमच्या मदतीने खातेधारक त्यांच्या आधार नंबरच्या साहाय्याने एका खात्यातून दुसऱ्या खातामध्ये पैसे पाठवू शकतात किंवा स्वत:च्या खात्यामध्ये पैसे देखील प्राप्त करू शकतात. हा व्यवहार सुरक्षित देखील आहे कारण याकरता कोणत्याही बँक संबधित माहितीची गरज नाही. अधिकृत व्यवहारासाठी तुमच्या हाताच्या बोटांचे ठसे आवश्यक आहेत.

कसे काढाल पैसे?

संपूर्ण देशभरामध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे, मात्र याचा लाभ तेच व्यक्ती घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांचं इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये  (IPPB) देखील खातं असणं आवश्यक आहे. AePS सुविधेअंतर्गत डाक विभागाकडून IPPB मध्ये जन धन खातेधारकांप्रमाणेच कोणत्याही बँकेतील ग्राहकांना इंटरऑपरेबल डोरस्टेप बँकिंग सेवा देतात.

(हे वाचा-बँक खात्यात तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? SBIने 44 कोटी ग्राहकांना केलं सावधान)

या सुविधेअंतर्गत तुम्ही खात्यातील पैसे देखील तपासू शकता. त्याचप्रमाणे मनी ट्रान्सपर आणि फंड ट्रान्सफरची सुविधा देखील मिळते. बँकेतून IPPB मध्ये देखील पैसे पाठवता येणं शक्य आहे. बँकिंगबरोबरच गैर बँकिंग ट्रान्झाक्शन सुविधाही मिळते. AePS द्वारे ट्रान्झाक्शन करण्यासाठी डेबिट/क्रेडिट कार्ड दाखवणे आवश्यक नाही. याकरता तुमचे फिंगरप्रिंट लागत असल्याने ही सुविधा सुरक्षित आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published:

Tags: Post office