लॉकडाऊनंतर कधीपासून सुरू होणार रेल्वे? जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा प्लॅन

लॉकडाऊनंतर कधीपासून सुरू होणार रेल्वे? जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा प्लॅन

भारतीय रेल्वेने (Indian Railway) 3 मेपर्यंत सर्व पॅसेंजर ट्रेन्स रद्द केल्या आहेत. एवढच नव्हे तर 3 मेनंतर सुद्धा रिझर्व्हेशन बंद ठेवण्यात आले आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 23 एप्रिल : भारतीय रेल्वेने (Indian Railway) 3 मेपर्यंत सर्व पॅसेंजर ट्रेन्स रद्द केल्या आहेत. एवढच नव्हे तर 3 मेनंतर सुद्धा रिझर्व्हेशन बंद ठेवण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की 4 मेपासून ट्रेन्स सुरू होतील की नाही याबाबत रेल्वेकडून कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. लॉकडाऊन केंद्राने परवानगी दिल्यानंतरच रेल्वे रुळावर येणार आहेत. केंद्र सरकार सुद्धा राज्यांशी चर्चा करून याबाबत योग्य निर्णय घेण्याच्या विचारात आहे. सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. परिणामी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जरी रेल्वे सुरू झाली तरी कोरोनाची भीत असणारच आहे. त्यामुळे रेल्वेकडून विविध झोन आणि डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.

यानुसार खालीलपैकी काही शक्यतांचा विचार सुरू आहे

1. ट्रेन ऑपरेशन सुरू झाल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस निवडक ट्रेन्स चालवण्यात येतील. स्पेशल ट्रेनप्रमाणेच या ट्रेनचं भाडंही जास्त असेल.  त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी टाळण्यास मदत होईल आणि ज्यांना अत्यंत आवश्यक आहेत तेच प्रवास करतील

(हे वाचा-सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा सर्वात मोठा फटका, मिळणार नाही वाढीव महागाई भत्ता)

2. रेल्वेने 19 मार्चपासूनच दिव्यांग, स्टूडंट्स आणि मेडिकल ग्राऊंडवर तिकिटांमध्ये मिळणारी सूट थांबवली आहे. ट्रेनमध्ये गर्दी कमी करणे हा यामागचा उद्देश होता. विशेषत: वरिष्ठ नागरिकांना प्रवासापासून दूर ठेवणे हे देखील रेल्वेचे उद्दिष्ट्य होते. गर्दी कमी करण्यासाठी आधी घेतलेल्या निर्णयांची भविष्यात देखील काही कालावधीसाठी अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

3. रेल्वे सुरूवातीला केवळ स्लीपर क्लास ट्रेन चालवेल आणि यामध्ये त्यांनाच प्रवेश मिळेल ज्यांच्याकडे कन्फर्म तिकीट आहे. त्यामुळे जनरल डब्यामध्ये होणारी गर्दी टाळता येईल. एसी ट्रेनमध्ये बंद वातावरणामध्ये संक्रमणाची भीती देखील स्लीपर कोच वापरल्यास कमी राहील

(हे वाचा-संकटकाळात कामी येईल तुमचं ATM, मोदी सरकार देतंय या सुविधा मोफत)

4. रेल्वेने स्लीपर क्लासच्या 5 हजारहून अधिक डब्यांचे आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर केले आहे. त्याकरता मधली एक सीट हटवण्यात आली आहे. मात्र या डब्ब्यांची अजून आयसोलेशन वॉर्ड म्हणून गरज पडत नाही आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामुळे यांचा वापर होण्याची शक्यता कमी आहे. या डब्ब्यांचा वापर करून रेल्वे स्पेशल ट्रेन सुरू करण्याची शक्यता आहे. जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग अबाधित राहील.

5. सुरूवातीला ठराविक स्टेशनवरच ट्रेन चालवण्यात येईल. ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्याठिकाणाहून कोणताही प्रवासी रेल्वेमध्ये चढणार नाही किंवा त्याठिकाणी उतरणार नाही.

(हे वाचा-परप्रांतीयांना गावी सोडण्याबद्दल अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र)

सर्व कर्मचारी आणि प्रवासी यांची सुरक्षा हे रेल्वेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. रेल्वेला आरोग्य आणि गृहमंत्रालयाने सांगितेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत सेवा सुरू करावी लागणार आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: April 23, 2020, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading