नवी दिल्ली, 23 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) अनेक देशांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. भारत देखील कोरोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण काही घटकांना कोरोनामुळे फटका बसणं सुरुच आहे. केंद्र सरकारने त्यांचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता (Dearness Allowance DA) देण्याचा निर्णय थांबवण्यात आला आहे. जानेवारी महिन्यापासून थकित असणारा हा वाढीव भत्ता देण्यात केंद्र सरकारने आता रोख लावली आहे. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आलेला महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 21 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र आता 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2020पासून वाढणारा महागाई भत्ता थांबवण्यात आला आहे. (हे वाचा- मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, जॅक मा यांना टाकलं मागे ) कोरोना व्हायरसमुळे देशाच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येक आहे. मात्र सरकारच्या आताच्या निर्णयाचा परिणाम केंद्राचे 54 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांवर होणार आहे. बुधवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
#JustIn | Govt freezes dearness allowance of staff at current levels, says dearness allowance frozen due to #COVID19 pic.twitter.com/Nf4UnKgqxk
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) April 23, 2020
सरकारची 14,595 कोटी रुपयांची होईल बचत केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा 4 टक्क्यांनी वाढवण्यात आलेला महागाई भत्ता थांबवल्याने सरकारचे दर महिन्याला सुमारे 1000 कोटी रूपये वाचतील. महागाई भत्ता वाढवण्यासाठी सरकारकडून अतिरिक्त 14,595 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. 21 एप्रिल पासून अंशत: काही गोष्टी सुरू देखील करण्यात आल्या आहेत. संपादन - जान्हवी भाटकर