Home /News /money /

संकटकाळात कामी येईल तुमच्या जनधन खात्याचे ATM, मोदी सरकार देतंय या सुविधा मोफत

संकटकाळात कामी येईल तुमच्या जनधन खात्याचे ATM, मोदी सरकार देतंय या सुविधा मोफत

पीएम जनधन योजना 2020 अंतर्गत जर तुम्ही खाते उघडले असेल तर 1 लाखापर्यंतचा अपघात विमा मोफत मिळतो. तर बरोबरच 30 हजार रुपयांंचा जीवन विमा मिळतो.

    नवी दिल्ली, 22 एप्रिल : कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊन काळात या संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकार नागरिकांच्या जनधन खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करत आहे. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत (PMJDY) उघडण्यात आलेल्या खात्यांद्वावे ग्राहकांना विविध सुविधा देण्यात येतात. पीएम जनधन योजना 2020 अंतर्गत जर तुम्ही खाते उघडले असेल तर 1 लाखापर्यंतचा अपघात विमा मोफत मिळतो. तर बरोबरच 30 हजार रुपयांंचा जीवन विमा मिळतो. हा विमा जनधन खात्याबरोबर मिळणाऱ्या रुपे डेबिट कार्ड (Rupay Debit Card) वर मिळेल. लाभार्थीच्या मृत्यूनंतर याची रक्कम मिळते. यासाठी काही नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे. या विम्याचा प्रीमियम नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) केले जाते. (हे वाचा-सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचे भाव वधारले, जाणून घ्या बुधवारचे दर) या अटींवर मिळेल क्लेम जनधन योजनेअंतर्गत व्यक्तिगत अपघात विम्यासाठी क्लेम तेव्हाच मिळेल जेव्हा रुपे कार्डधारक कोणत्याही बँकेच्या शाखेत, बँक मित्र, एटीएम, पीओएस, ई-कॉम इत्यादी चॅनेलवर कमीतकमी एक सफल वित्तीय व्यवहार किंवा गैर-वित्तीय व्यवहार आपल्या स्वत:च्या बँकेतून किंवा/आणि दुसऱ्या बँकेतून दुर्घटना तारीख नोंदवेल. त्यानंतर 90 दिवसांमध्ये क्लेम मिळेल. (हे वाचा-Jio मध्ये Facebook सर्वात मोठा भागीदार, वाचा या करारातील 8 महत्त्वाच्या गोष्टी) त्याचप्रमाणे ग्राहकांना अन्य बँकांप्रमाणेच रुपे डेबिट कार्ड आणि ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. प्रति परिवार खासकरून कुटुंबांतील महिलेच्या खात्यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. ग्राहकांना किमान शिल्लक रक्कम (Minimum Balance) ठेवण्याचीही आवश्यकता नसते. कसं आणि कुठे उघडाल जनधन खाते? जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही जनधन खाते उघडू शकता. बँक मित्रच्या साहाय्याने देखील जनधन खाते उघडण्याचा पर्याय आहे. याकरता ग्राहकांना किमान शिल्लक रक्कम (Minimum Balance) ठेवण्याचीही आवश्यकता नसते. जनधन खाते उघडण्यासाठी केवायसी (Know Your Customer) डिटेल्स पूर्ण करणे आवश्यक आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: PM narendra modi

    पुढील बातम्या