Home /News /money /

विशेष ट्रेनने घरी परतण्याच्या विचारात आहात? जाणून घ्या प्रवासादरम्यान काय कराल आणि काय नाही

विशेष ट्रेनने घरी परतण्याच्या विचारात आहात? जाणून घ्या प्रवासादरम्यान काय कराल आणि काय नाही

Text

Text

लॉकडाऊनमध्ये (Lockdown) सरकारने 12 मे 2020 पासून 15 स्पेशल एसी ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

    नवी दिल्ली, 11 मे : लॉकडाऊनमध्ये (Lockdown) सरकारने 12 मे 2020 पासून 15 स्पेशल एसी ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध राज्यांमध्ये उद्यापासून या ट्रेनची सुरूवात होणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून या ट्रेनच्या बुकिंग्जना सुरूवात होणार आहे. या रेल्वे प्रवासासाठी तिकीटांचे बुकिंग केवळ ऑनलाइन होणार आहे. आयआरसीटीसी (IRCTC)  च्या वेबसाइटवरूनच हे बुकिंग करता येणार आहे. या प्रवासासाठी कोणत्याही स्थानकाच्या काउंटवर तिकीट मिळणार नाही. या रेल्वे स्पेशल रेल्वे म्हणून नवी दिल्ली स्टेशन वरून दिब्रुगड, आगरताळा, हावडा, पटना बिलासपुर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू पर्यंत असेल. तसेच चेन्नई, तिरुवनन्तपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावी या शहरांतूनही रेल्वे सेवा सुरू सुरू होतील. (हे वाचा-अरे बापरे! शहरात तब्बल 334 कोरोना सुपर स्प्रेडर; नकळत पसरवत आहेत व्हायरस) या रेल्वेने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. काही गोष्टी ध्यानात ठेवल्यास सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे शक्य आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे- -प्रवाशांना दोन तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचणे आवश्यक आहे. -ज्या प्रवाशांकडे कन्फर्म्ड आणि वैध तिकीट असेल त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. -प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक राहील. मास्कसाठी तुम्ही गमछा किंवा स्कार्फचा देखील वापर करू शकता. (हे वाचा-कोरोनामुळे मनं जुळली! घटस्फोट घेतलेल्या सुनेची सासुने केली मनधरणी आणि...) -रेल्वे सुरू होण्याआधी रेल्वे प्रवाशांना स्क्रिनिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल -सोशल डिस्टिंसिंगच्या नियमांचे पालन काटेरोरपणे करणं आवश्यक आहे -ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण नाही आहेत, त्यांनाच रेल्वेमध्ये चढण्यास परवानगी देण्यात आली आहे. -सर्व प्रवाशांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे गरजेचे आहे, अन्यथा ट्रेनमध्ये चढता येणार नाही -ट्रेनमध्ये तुम्हाला रेल्वे विभागाकडून चादर किंवा पांघरूण मिळणार नाही. कोरोनाच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता शासनाने ही योजना बंद केली आहे (संबधित-आज संध्याकाळी 4 पासून सुरू होणार विशेष ट्रेनचं बुकिंग, घरबसल्या असं काढा तिकिट) -प्रवाादरम्यान मध्ये कुठेही खाण्यापिण्याचे पदार्थ मिळणार नाही -तिकीट बुकिंगवर कोणतीही सूट मिळणार नाही संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Indian railway, IRCTC

    पुढील बातम्या