Home /News /national /

कोरोनामुळे मोडका संसार पुन्हा जुळला, 3 वर्षांपूर्वी घटस्फोट घेतलेल्या सुनेची सासुने केली मनधरणी आणि...

कोरोनामुळे मोडका संसार पुन्हा जुळला, 3 वर्षांपूर्वी घटस्फोट घेतलेल्या सुनेची सासुने केली मनधरणी आणि...

कोरोना लॉकडाऊनमुळे तुटलेला संसार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. 3 वर्षांपूर्वी घटस्फोट घेतलेल्या नवरा-बायकोमध्ये पुन्हा एकदा गोडी निर्माण झाली आहे. यामध्ये सुनेची मनधरणी चक्क तिच्या सासुने केली आहे.

    भोपाळ, 11 मे  : कोरोना (Coronavius) मुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र भोपाळमध्ये अशी घटना घडली आहे की, कोरोना लॉकडाऊनमुळे तुटलेला संसार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. 3 वर्षांपूर्वी घटस्फोट घेतलेल्या नवरा-बायकोमध्ये पुन्हा एकदा गोडी निर्माण झाली आहे. या नवरा-बायकोला 7 वर्षांची मुलगी आहे आणि सध्या तिचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. यामध्ये सुनेची मनधरणी चक्क तिच्या सासुने केली आहे. त्यांनी सुनेला समजावलं की आता कोरोनाच्या संकटकाळात काहीही होऊ शकतं, तु आता परत ये. सुनबाई आणि तिच्या आई-वडिलांना समजवण्यासाठी या सासुने घरामध्ये धरणं देखील धरलं. सासुच्या या प्रयत्नामुळे सुनेचा रागही मावळला आणि ती घरी परतली. त्यामुळे तुटलेला संसार कोरोनामुळे पुन्हा सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. (हे वाचा-14 शहरांसाठी आजपासून सुरू होणार बुकिंग, जाणून घ्या विशेष ट्रेनबाबतच्या 10 गोष्टी भोपाळमध्ये सिंधी कॉलनीतील या जोडप्याचा विवाह 2012 मध्ये झाला होता. दोघांना 7 वर्षांची मुलगी देखील आहे. दोघांमध्ये काही वर्षांनंतर कौटुंबिक वाद होऊ लागले, अगदी मारझोड सुद्धा होऊ लागली. शेवटी विषय घटस्फोटापर्यंत पोहोचला. दोघांच्या कुटुंबामध्ये देखील कटूता निर्माण झाली. दोघांमध्ये नातं पुन्हा जुळावंं याकरता कोर्टाकडून तीन वेळा काउंसिलिंग देखील करण्यात आलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर 2017 मध्ये ते दोघं वेगळे झाले. वडिलांना मुलीला भेटता येत नसल्यामुळे ते अतिशय दु:खी असत. (हे वाचा-ममतांचा भाऊ आणि मुख्य सचिवांचा फेक फोटो शेअर, केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध गुन्हा) लॉकडाऊनमध्ये घरीच राहत असल्यामुळे सासुबाईंना तिच्या मुलाचं दु:ख प्रकर्षाने जाणवू लागलं. कारण तो दिवसभर त्याच्या खोलीतच राहायचा केवळ जेवणासाठी बाहेर येत असे. मुलीचे फोटो, लग्नाचे फोटो पाहून दिवस घालवत असे. या सगळ्या प्रकारामध्ये मुलगा डिप्रेशनमध्ये गेल्याचं या माऊलीला जाणवू लागलं आणि शेवटी त्यांच्या काउंन्सिलरने दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी सुनेची मनधरणी करण्याचं ठरवलं. त्यांनी सुनेच्या घरी जाऊन तिची, तिच्या घरच्यांची माफी मागीतली. घराबाहेर त्या धरणं देऊन बसून राहिल्या. त्यांंना चिंता होती की जर कोरोनामुळे त्यांना काही झालं तर मुलाची काळजी कोण घेणार. सहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना सुनेची मनधरणी करण्यात यश आलं. सासुबाईंनी त्या दोघांचं पुन्हा एकदा लग्न देखील लावून दिलं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या