मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोठी बातमी : आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू होणार विशेष ट्रेनचं बुकिंग, घरबसल्या असं काढा तिकीट

मोठी बातमी : आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू होणार विशेष ट्रेनचं बुकिंग, घरबसल्या असं काढा तिकीट

12 मेपासून नवी दिल्ली ते विविध राज्यात 15 विशेष एसी गाड्या चालवण्यात येणार आहेत. आज सायंकाळी चार वाजल्यापासून या रेल्वे गाड्यांसाठी तिकिट बुकिंग सुरू होईल.

12 मेपासून नवी दिल्ली ते विविध राज्यात 15 विशेष एसी गाड्या चालवण्यात येणार आहेत. आज सायंकाळी चार वाजल्यापासून या रेल्वे गाड्यांसाठी तिकिट बुकिंग सुरू होईल.

12 मेपासून नवी दिल्ली ते विविध राज्यात 15 विशेष एसी गाड्या चालवण्यात येणार आहेत. आज सायंकाळी चार वाजल्यापासून या रेल्वे गाड्यांसाठी तिकिट बुकिंग सुरू होईल.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 11 मे : लॉकडाऊनमुळं परराज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या घरी पाठवण्यासाठी रेल्वेच्या (Indina Railway) वतीनं मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 12 मेपासून नवी दिल्ली ते विविध राज्यात 15 विशेष एसी गाड्या चालवण्यात येणार आहेत. आज सायंकाळी चार वाजल्यापासून या रेल्वे गाड्यांसाठी तिकिट बुकिंग सुरू होईल. या गाड्यांची तिकिटे फक्त ऑनलाइन बुक केली जातील. बुकिंग फक्त आयआरसीटीसी वेबसाइटद्वारे करता येणार आहे.

दरम्यान या गाड्यांचे भाडे सुपर फास्ट ट्रेनसारखेच असेल. या गाड्यांच्या डब्यांच्या सर्व 72 जागांवर बुकिंग करण्यात येणार असून त्यांच्या भाड्यात कोणतीही सूट मिळणार नाही. तुम्ही घरात बसून ट्रेनचे तिकिट बुक करू शकता.

या शहरांमध्ये धावणार ट्रेन

या विशेष गाड्या नवी दिल्ली स्थानक ते बिलासपूर, दिब्रूगड, अगरतला, हावडा, पटना, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई मध्यवर्ती, अहमदाबाद आणि जम्मूतावी या मार्गांवर धावतील. तसेच, रेल्वेने असं म्हटलं आहे की या गाड्यांमध्ये जागा राखीव करण्यासाठी (Reserved Seats) प्रवाशांना सुटण्याच्या वेळेच्या किमान एक तास आधी रेल्वे स्थानकात उपस्थित राहावे लागणार आहे.

बुकिंग काउंटर राहणार बंद, मास्क अनिवार्य

रेल्वे स्थानकांवर असलेले तिकिट बुकिंग काउंटर बंदच राहतील आणि बुकिंग काउंटरवर कोणतेही तिकिट (प्लॅटफॉर्म तिकिटांसह) दिले जाणार नाहीत. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. प्रवाशांना चेहरा झाकणे किंवा मास्क लावणे बंधनकारक असेल आणि रेल्वे सुटण्याच्या वेळी त्यांची तपासणी केली जाईल. केवळ त्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतील.

असे करा तिकिट बुक

>> ट्रेनचे तिकिट बुक करण्यासाठी सर्वात आधी www.irctc.co.in या ऑफिशिअल वेबसाइटवर जा.

>> वेबसाइटवर LOGINचा पर्याय असेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला युझर आयडी, पासवर्ड आणि कैप्चा भरावे लागले. जर irctc वर तुमचे लॉगइन आयडी नसेल तर REGISTER ऑप्शनवर क्लिक करा. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक, नाव ईमेल आयडी आणि पत्ता सारखी माहिती टाका.

>> लॉगइन केल्यानंतर Book Your Ticket लिहिलेल्या बॉक्सवर क्लिक करा. यावर तुम्हाला तुम्ही प्रवास करत असलेल्या ठिकाणाची माहिती द्यावी भरावी लागेल. From च्या पर्यायावर तुम्ही जेथून प्रवास करणार ते ठिकाण आणि To पर्यायवर जेथे जायचे आहे ते स्थानक. यानंतर तारिख सिलेक्ट करून Find Trains वर क्लिक करा.

>> यानंतर दोन्ही स्थानकांदरम्यान असलेल्या ट्रेनची यादी येईल. तेथे Check Availability & Fare चा पर्याय दिसेल. त्याचबरोबर स्लिपर क्लास, एसी 3 टायर, एसी 2 टायर, एसी फर्स्ट क्लास, एसी चेअर कार आणि एग्जिक्युटिव्ह चेअर असे पर्याय दिसतील. Check Availability & Fare वर क्लिक करत तुम्ही पाहू शकता की कोणत्या ट्रेनचे तिकिट उपलब्ध आहे.

>> ज्या ट्रेनचे तिकिट बुक करायचे आहे, त्याला सिलेक्ट करा आणि Book Now वर क्लिक करा.

>> यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, यात प्रवास करत असलेल्या व्यक्तीचे नाव, वय, लिंग, मोबाइल नंबरसह इतर माहिती भरावी लागले. त्यानंतर Continue Booking वर क्लिक करा.

>> आता तुम्हाला पेमेंटचे पर्याय येईल. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग किंवा मोबाइल वॉलेटच्या मदतीनं पेमेंट करू शकता.

>> पेमेंट केल्यानंतर तुमचे तिकिट बुक होईल. तिकिट बुक झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईल क्रमांकावर येईल. तसेच, तिकिट बुक झाल्यानंतर प्रिंटचा पर्यायही येतो.

First published:

Tags: IRCTC