अहमदाबाद, 11 मे : गुजरातमध्ये कोरोना (Gujrat coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे, आतापर्यंत 7 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. त्यात आता कोरोनाव्हायरसचे तब्बल 334 सुपर स्प्रेडर सापडलेत. ज्यांनी हजारो लोकांपर्यंत व्हायरस पसरवला असू शकतो. एकट्या अहमदाबाद (Ahmedabad) शहरातच इतके सुपर स्प्रेडर (corona super spreader) सापडल्यानं आता चिंता अधिकच वाढली आहे.
कोरोनाव्हायरसचा सुपर स्प्रेडर हा त्याच्या आणि इतरांच्या नकळत कित्येक लोकांपर्यंत व्हायरस पसरवत असतो. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, शहारातील जवळपास 14,000 लोकं अशी आहेत, ज्यांच्यामुळे संक्रमणाचा धोका जास्त आहे आणि पुढील 3 दिवसांत त्या सर्वांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे वाचा - Corona रुग्णांचा मृत्यू कसा झाला? आता डॉक्टरांना कारण द्यावं लागणार
अहमदाबाद नगरपालिकेनं अशा लोकांना शोधण्याचं काम 20 एप्रिलपासून सुरू केलं आहे. आतापर्यंत 3817 नमुने घेण्यात आले, त्यापैकी 334 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वेजालपूर परिसरात शनिवारी एक किराणा व्यावसायिक संक्रमित झाल्याचं समजल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून त्या दुकानातून खरेदी करणाऱ्या लोकांनी स्वत:ला आपल्या घरात आयसोलेट करून घेतलं आहे.
सुपर स्प्रेडर म्हणजे काय?
एखाद्या व्हायरसचं इन्फेक्शन झालेली व्यक्ती सामान्य स्प्रेडर असते. म्हणजे त्या व्यक्तीच्या संपर्कात एखादी व्यक्ती आल्यास तिलाही व्हायरसचं इन्फेक्शन होतं. त्यानंतर या दोन्ही व्यक्तींमध्ये लक्षणं दिसून येतात. सामान्य स्प्रेडर सरासरी 2.6 व्यक्तींपर्यंत व्हायरस पसरवतो. मात्र सुपर स्प्रेडर हा सामान्य स्प्रेडरपेक्षा वेगळा आहे. त्याला सामान्य स्प्रेडरप्रमाणेच व्हायरसचं इन्फेक्शन होतं आणि आपल्याला व्हायरसचं इन्फेक्शन झालं याची कल्पना त्यालाही नसते. त्यामुळे नकळतपणे तो इतर व्यक्तींच्या संपर्कात येतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरस पसरवतो.
हे वाचा - ना औषध ना लस, 23 दिवसांच्या बाळानं फक्त आईच्या दूधानं कोरोनाला हरवलं
सुपर स्प्रेडर सरासरी 8 जणांपर्यंत व्हायरस पसरवतो आणि त्यातही जर कोरोनाव्हायरससारखा व्हायरस जो लक्षणं दिसण्याच्या आधी शरीरात असतो, त्याचा प्रसार होतच असतो.
कोण येतं सुपर स्प्रेडरच्या श्रेणीत?
भाजी व्रिकेता, किराणा विक्रेता, दूध विक्रेता, पेट्रोल पंपवरील कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी हे सर्व कोरोनाव्हायरसचे सुपर स्प्रेडर असू शकतात. हे सर्व जण कामाच्या निमित्तानं कित्येक लोकांच्या संपर्कात येतात. ते स्वत:ही संक्रमित होतात आणि इतरांनाही संक्रमित करतात. त्यामुळे तुमच्या आसपासही कोरोनाचा असा सुपर स्प्रेडर असू शकतो. त्यामुळे सावधनात बाळगा आणि काळजी घ्या.
संकलन, संपादन - प्रिया लाड
हे वाचा - गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद, पाहा चिंता वाढवणारी आकडेवारी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus symptoms