जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Income tax server down : आधार-पॅन लिंक करण्यात अनेक अडचणी, वेबसाईट डाऊन

Income tax server down : आधार-पॅन लिंक करण्यात अनेक अडचणी, वेबसाईट डाऊन

income tax

income tax

Income tax server down : अनेक जण एकाच वेळी आधार पॅन लिंक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे सर्व्हरवर लोड आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : आधार पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च देण्यात आली आहे. ही तारीख सातत्याने वाढवण्यात आली होती. मात्र आता वाढवली जाणार नाही अशी सक्त ताकीद आयकर विभाग आणि सरकारकडून सांगण्यात आलं आहे. आता 1000 रुपये दंड भरून आधार पॅन लिंक करायचं आहे. त्यामुळे ज्यांनी केलं नाही ते अगदी शेवटच्या क्षणी उघडून बसले आहेत. अनेक जण एकाच वेळी आधार पॅन लिंक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे सर्व्हरवर लोड आला आहे. आयकर विभागाची साईट डाऊन झाल्याने अनेकांनी ट्विट सोशल मीडियावर केलं आहे. आधार पॅन लिंक करताना हजार रुपये भरले, मात्र प्रत्यक्षात जेव्हा लिंक होण्याची स्टेप आली तेव्हा सर्व्हर डाऊन झाल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.

Fact Check : तुमच्या बायकोकडे Pan card असेल तर सरकार देणार 10 हजार?
News18लोकमत
News18लोकमत
जाहिरात
जाहिरात
Good News! फक्त एक SMS आणि लगेच कळणार Adhara Pan Link Status

जर तुम्ही पॅन आधार लिंक केलं नाही तर 1 एप्रिलपासून तुमचं पॅनकार्ड बंद होईल. तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. दुसरीकडे सर्व्हर डाउन असल्याने वेबसाइट चालत नाही. त्यामुळे लोकांनी ही मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. पॅन आधार लिंक करण्याची मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी सरकार आणि आयकर विभागाला केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात