तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं का? केलं नसेल तर लगेच करून टाका कारण 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर पॅनकार्ड काही कामाचं उरणार नाही. या सगळ्यात सोशल मीडियावर एक मेसेज सध्या वेगानं फिरत आहे. तुमच्या बायकोकडे पॅनकार्ड असेल तर तुम्हाला सरकार 10 हजार रुपये देणार.
आपल्याकडे आलेले मेसेज सरळ फॉरवर्ड केले जातात. मात्र आज या व्हायरल मेसेज मागचं नेमकं सत्य काय आहे .
PNB ने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही.
सरकारने लोकांना अशा व्हायरल बातम्या कोणाशीही शेअर करू नका आणि केवळ सरकारी वेबसाइटवर विश्वास ठेवा असं आवाहन केलं आहे.
तुम्हालाही असाच मेसेज आला तर घाबरू नका. असे फेक मेसेज कोणाशीही शेअर करू नका. तसेच, तुम्ही कोणतीही बातमी तपासून पाहू शकता.
यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकवर जावे लागेल. तुम्ही whatsapp क्रमांक +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता.