तुम्ही जर अजूनही आधार कार्ड पॅनसोबत लिंक केलं नसेल तर तुमच्याकडे आता खूप कमी वेळ उरला आहे. 19 दिवस शिल्लक आहेत, तुम्ही केलं नाही तर तुमचं पॅनकार्ड कचऱ्यात फेकण्याच्या लायकीचं उरेल.
तुम्हाला बँकेपासून ITR फाइल करण्यापर्यंत कोणतीच कामं करता येणार नाहीत. या सगळ्यासाठी पॅनकार्ड आवश्यक असतं. यासाठीच वेळ न दवडता आधार पॅन लिंक आहे की नाही ते लगेच आयकर विभागाच्या साइटवर जाऊन चेक करा.
तुम्ही आता 1000 रुपये दंड भरून आधार पॅन कार्ड लिंक करू शकता. मात्र 31 मार्चनंतर तुमच्याकडे ही संधी उरणार नाही.
31 मार्चनंतर तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. याशिवाय कागदपत्र जमा करून पॅनकार्ड काढायचा व्याप असेल तो वेगळाच
त्यामुळे तुम्ही या सगळ्या अडचणी टाळण्यासाठी आताच आयकर विभागाच्या साईटवर जाऊन तुमचं आधार पॅनकार्ड लिंक आहे की नाही ते चेक करा. नसेल तर लगेच लिंक करून टाका.
SMS च्या माध्यमातूनही तुम्ही पॅन-आधार लिंक स्टेटस चेक करु शकता. यासाठी 'UIDPAN < 12 digit Aadhaar number> < 10 digit Permanent Account Number>' या फॉर्मेटमध्ये 567678 किंवा 56161 नंबरवर मॅसेज पाठावा.